Form 16 New format for salary TDS certificate | (File Image)

New Format For salary TDS Certificate: अधिक उत्पन्न असूनही आयकर न भरणाऱ्या मंडळींना आता चांगलाच चाप लागणार आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड (Central Board of Direct Taxes) आता करचुकवेगिरी करणाऱ्या मंडळींसाठी फॉर्म-16 (Form-16)मध्ये सुधारीत नियम घेऊन आले आहे. या नव्या बदलासोबतच सीबीडीटी (CBDT) कंपनीकडून फॉर्म-16 अंतर्गत अधिक माहिती मागवणार आहे. तसेच, सीबीडीटीने आता फॉर्म-16चा आकारही वाढवला आहे. नव्या फॉर्म-16 मध्ये पार्ट बी (एनेक्सर) चा भाग आता दोन पानांऐवजी आता पाच पानांचा असणार आहे.

केंद्रीय अर्थमंत्रालयाकडून फॉर्म-16 संबंधी बदलाची अधिसूचना 12 मे 2019 लागू होईल. यात वर्ष 2018-19 साठी कर्मचाऱ्याला कंपनीकडून देण्यात येणारा फॉर्म-16 प्रोफार्मावर असणार आहे. यात आर्थिक वर्षादरम्यान, एका संस्थेतून दुसऱ्या संस्थेमध्ये आलेल्या कर्मचाऱ्यांच्या आगोदरच्या संस्था, कंपनीतील एकूण वेतनाचा कॉलमही जोडण्यात येणार आहे.

या एकूण वेतनातील कॉलमचा विस्तार (ई) मध्ये देण्यात आला आहे. जुन्या फॉर्म-16मध्ये या कॉलमचा उल्लेख नव्हता. सोबतच यात डिडक्शनलाही विशेष स्थान दिले आहे. कर अभ्यासकांच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे की, वेतनाचा लाभ घेणाऱ्या करदात्यांसाठी स्टॅडर्ड डिडक्शन पर्यायही आगोदरच्या वर्षाप्रमाणेच केला आहे. त्यासाठी या वेळी फॉर्म-16 जोडण्यात आला आहे. त्यामुळे आता डिडक्शनची माहिती विस्ताराने द्यावी लागणार आहे.

आयकर विश्लेषक आणि अभ्यासक सांगतात की, नव्या फॉर्म-16 साठी कंपनीकडून अधिक माहिती मागविण्यात आली आहे. त्यामुळे सहाजिकच कंपन्याही आपल्या कर्मचाऱ्याकडून अधिक माहिती घेतली. त्यामुळे कर्मचाऱ्यांना एक एक डिडक्शनची योग्य माहिती द्यावी लागणार आहे. त्यामुळे घोटाळा, दिशाभूल, फसवणूक, चुकीची आणि त्रोटक माहिती देऊन आपला हेतू साध्य करणाऱ्या मंडळींना चाप लागणार आहे.

दरम्यान, फॉर्म-16 हे एक प्रमाणपत्र असते. जे कर्मचारी काम करत असलेली कंपनी आपल्या कर्मचाऱ्याला देते. त्यासाठी कर्मचाऱ्यांचा टीडीएस (आर्थिक स्त्रोतानुसार कपात) तपशील असतो. हे प्रमाणपत्र जूनच्या मध्यावर कंपनीकडून जारी करण्यात येते. ज्याचा उपयोग आयकर रिटर्न (ITR) करताना केला जातो. (हेही वाचा, UIDAI PAN Card Update: आता Online पद्धतीने पॅन कार्ड करा अपडेट; @ tin.nsdl.com वर अप्लाय करा )

फॉर्म-16 मध्ये आलेला बदल 12 मे 2019 पासून लागू होईल. याचाच अर्थ असा की, 2018-19 साठी आयकर रिटर्न सुधारीत फॉर्म 16 नुसार भरला जाईल. त्याशिवाय फॉर्म 16 मध्ये बचत खात्यात जमा व्याजासंदर्भात कपातीचा तपशील, सूट अधिभार (लागू असेल तर) आदींचा समावेश असतो. आयकर विभागाने आगोदरच 2018-19 साठी आयकर रिटर्न प्रक्रिया पार पाडली आहे. मासिक वेतनाचा लाभ घेणाऱ्या आणि आपल्या खात्याचे ऑडीट न करणाऱ्या कर्मचाऱ्यांना या वर्षी 31 जुलै अखेर आयटीआर भरणे अनिवार्य आहे.