कोरोना व्हायरसचे संक्रमण रोखण्यासाठी देशव्यापी लॉकडाउनचे आदेश लागू करण्यात आले आहे. या दरम्यान फक्त अत्यावश्यक सेवासुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. त्यामुळे वाहन, कारखाने आणि कार्बन डायऑक्साइड उत्सर्जन संबंधित गोष्टी बंद राहिल्याने गेल्या पाच दिवसात दिल्लीसह अन्य महानगरांमध्ये प्रदुषणाचा स्तरात 20 ते 25 टक्क्यांनी घट आली आहे. केंद्रीय प्रदुषण नियंत्रण बोर्ड यांनी जाहिर केलेल्या आकडेवारीनुसार 22 मार्चला जनता कर्फ्यू दरम्यान वायुप्रदुषणामुळे सर्वाधिक प्रभावित होणारी दिल्ली, मुंबई, अहमदाबाद आणि पुणे येथील हवमानाच्या गुणवत्तेत अधिक बदल झाल्याचे दिसून आले आहे. या शहरांमध्ये वायप्रदुषण करणाऱ्या उत्सर्जनमध्ये 15 ते 50 टक्क्यांपर्यंत घट झाली आहे.
जनता कर्फ्यू नंतर गेल्या चार दिवसात लॉकडाउनच्या पार्श्वभुमीलक वायुची गुणवत्ता सुधारल्याचे दिसून आले आहे. गुरुवार पर्यंतच्या आकडेवारीनुसार दिल्ली, नोएडा आणि गाजियाबादसह अधिकतर शहरांमधील हवेची गुणवत्ता उत्तम असल्याचे समोर आले आहे. तर वाराणसी आणि ग्रेटर नोएडासह 14 शहरातील वायुगुणवत्ता समाधानकारक असल्याचे सांगण्यात आले आहे. देशातील 104 शहरातील वायुप्रदुषणाच्या स्थितीवर सीपीसीबी यांच्या वायु गुणवत्ता सुचांचकानुसार माहिती देण्यात येते. सध्या अतीगंभीर आणि वाईट वायुप्रदुषण असणारे एकही शहर नसल्याचे सांगण्यात आले आहे.(Coronavirus Outbreak In India: देशांतर्गत विमानसेवा देखील 14 एप्रिल पर्यंत स्थगित)
हवामान अंदाज संस्थेने स्कायमेटचे पर्यावरण तज्ज्ञ डॉ महेश पलावत म्हणाले की, लॉकडाऊन दरम्यान शहरी भागातील वायू प्रदूषण चतुर्थांशने खाली आले आहे.याची तीन प्रमुख कारणे सांगत ते म्हणाले की लॉकडाऊनमुळे होणारी वाहने थांबणे, विकास प्रकल्पांचे थांबणे, बांधकाम उपक्रम आणि हवामानातील मनस्थिती यामुळे प्रदूषण कमी करण्यात मोठी भूमिका बजावली आहे. डॉ. पलावत म्हणाले की, वाहन आणि धूळ प्रदूषण कमी होण्याची परिस्थिती सीपीसीबी व प्रवासी आकडेवारीतून उघडकीस आली आहे. तसेच वायव्य भारतात पाऊस आणि जोरदार वारा यामुळे प्रदूषण करणार्या घटकांना गेल्या तीन दिवसांपासून वातावरणात सुधारणा झाली आहे. परिणामी वायू प्रदूषणाची परिस्थिती सुधारली आहे.