Representational Image (Photo Credits: Youtube Screenshot)

भारतामध्ये कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने 14 एप्रिल पर्यंत लॉकडाऊन जाहीर केलं आहे. दरम्यान या काळात आंतरराष्ट्रीय विमानसेवांपाठोपाठ आता देशांर्तगत विमान आणि रेल्वे सेवादेखील लॉकडाऊनच्या काळात बंद राहणार आहे. अशी माहिती भारत सरकारने दिली आहे. 22 मार्चपासून देशांर्तगत हवाई सेवा कोरोना व्हायरस प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आली आहे. भारतातील Novel Coronavirus चा वाढता धोका पाहता आता हवाई उड्डाण मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. कोरोना व्हायरसची साखळी तोडण्यासाठी आता लोकांचा एकमेकांशी थेट कमी करण्याच्या सरकारचा प्रयत्न आहे. त्याच्या अनुषंगाने आता सरकारने भारतीयांना पुढील काही दिवस जिथे आहात तेथेच रहा असा सल्ला दिला आहे. Coronavirus: कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणे 14 एप्रिलपर्यंत बंद राहणार: नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने दिल्या सुचना

चीन पाठोपाठ युरोप, अमेरिकेमध्ये कोरोना व्हायरसने थैमान घातलं आहे. भारतामध्ये तशी परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून भारत सरकार कठोर पावलं उचलत आहे. सध्या 14 एप्रिल पर्यंत देशात संपूर्णपणे संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र या लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आले आहे. नागरिकांना दूध, भाजीपाला, फळं, औषधं आणि इतर वैद्यकीय उपचारांसाठी बाहेर पडण्याची मुभा आहे.

ANI Tweet

भारतातील नागरिकांनी सरकारने घालून दिलेल्या नियमावलीचे तंतोतंत पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान एकाही व्यक्तीने नियमभंग करणं म्हणजे आमचे कोरोना व्हायरस विरूद्ध लढाईचे सरकारी प्रयत्न शून्यावर येण्यासारखे आहे. मागील 24 तासामध्ये 75 नवे रूग्ण आणि 4 मृत्यू झाले आहेत. तर देशातील एकूण कोरोनबाधितांचा आकडा 724 वर पोहचला आहे.