ATM | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

एटीएम (ATM) द्वारा आपल्याला कधीही पैसे काढता येतात. एटीएममध्ये पैसे (ATM Transaction) असतील आणि कोणताही तांत्रिक अडथळा नसेल तर शक्यतो पैसे लगेच निघतात. अपवादात्मक स्थितीत असे होते की, एटीएममधून (ATM Transaction Issue) पैसे काढताना आपल्या अकाऊंटवरुन पैसे वजा होतात. परंतू, एटीएममधून (Automated Teller Machine) पैसे मात्र निघत नाहीत. कधीतरीच अशी घटना घडते. पण, अशा घटनेमुंळे अनेकांना घाबरायला होते. कारण, बाब पैशांची असल्याने आता मोठा आर्थिक फटका सहन करावा लागणार की काय? या विचाराने हे लोक घाबरेघुबरे होतात. पण, घाबरुन जाण्याची काहीच गरज नाही. जाणून घ्या काय सांगते रिझर्व्ह बँक (RBI Guidelines) आणि काय आहे एकूण प्रक्रिया. जेणेकरुन तुम्हाला तुमचे पैसे परत मिळतील.

एटीएममधून व्यवहार करताना मशिनमधून पैसे आलेच नाहीत आणि तुमच्या बँक खात्यावरुन ती रक्कम (तुम्ही एटीएम मशिनवर टाकलेली) वजा झाली. तर घाबरु नका. असे अपवादात्मक आणि केवळ तांत्रिक कारणामुळे घडते. तुमचे पैसे कुठेही जाणार नाही. तुमच्या पैशाची रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला (RBI) काळजी असते. आरबीआयचा स्पष्ट नियम आहे की, काही कारणामुळे ग्राहकाला जर एटीएममधून पैसे मिळाले नाहीत. त्याच्या बँक खात्यातून ती रक्कम वजा झाली असेल. तर, ते पैसे कोणत्याही स्थितीत वर्किंग पाच दिवसांमध्ये ग्राहकाला परत करा. एखाद्या बँकेने जर या नियमाचे उल्लंघन केले तर ग्राहक दाद मागू शकतो. तसेच, ही रक्कम परत न केल्याबद्दल प्रति दिन 100 रुपये दंड स्वरुपात संबंधित बँकेने देणे लागते. (हेही वाचा, ATM म्हणजे काय? Automated Teller Machine चा वापर करून सुरक्षित आर्थिक व्यवहार करताना या गोष्टींबाबत अलर्ट रहाच!)

काय काळजी घ्याल?

जर एटीएमधून व्यवहार करताना बँक ट्रॅंजेक्शन पूर्ण झाले नाही तर लगेचच विदड्रॉल नोटीफिकेशन तपासा. तसेच, आपल्या रकमेबाब तातडीने माहिती घ्या की आपले पैसे आपल्या खात्यावरुन वजा झाले आहेत किंवा नाही. एटीएममधून पैसे आले नाहीत आणि बँक खाद्यावरुन मात्र पैसे वजा झाले असतील तर पाच दिवस वाट पाहा. सर्वसाधारणपणे पाच दिवसांमध्ये पैसे तुमच्या खात्यावर जमा होतील. पण, जर पाच दिवसांमध्ये पैसे खात्यावर परत आले नाहीत तर मात्र आपल्या बँकेच्या शाखेत जाऊन ट्रांन्जेक्शन फेल झाल्याची तक्रार करा. तक्रार करुनही जर आपल्या बँक खात्यावर 30 दिवसांमध्ये पैसे जमा झाले नाहीत तर आपण तक्रार निवरण विभागाच्या सीनियर ऑफिसरकडे तक्रार करु शकता.