भारतात दरवर्षी 5 लाख अपघातात 1.5 लाख लोकांचा मृत्यू; केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची माहिती
Union minister Nitin Gadkari (Photo Credits: IANS)

देशात दरवर्षी पाच लाख रस्ते अपघात (Accidents) होतात. या अपघातात दीड लाख लोक मरण पावले आहेत आणि सुमारे 3 लाख लोक जखमी आहेत. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी शनिवारी एका कार्यक्रमात ही माहिती दिली. मंत्रालयाने अनेक उपाय योजना योजूनही मृतांच्या संख्येत काहीही कमी झाली नाही, असेही त्यांनी सांगतले. नवीन मोटर वाहन कायदा (Motor Vehicle Act) लागू करुन सरकारने जनजागृती करण्याचा आणि नियमांचे पालन करण्यास भाग पडण्याचा प्रयत्न केला आहे. पण अजूनही परिस्थितीत कोणतीही सुधारणा झाली नाही.

नुकताच देशभरात रस्ता सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते, त्यामध्ये केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी भाग घेण्यासाठी नागपुरात दाखल झाले. यावेळी त्यांनी रस्ते अपघातांची माहिती दिली. रस्ते अपघातात मृत्यूंपैकी 62 टक्के मृत्यू 18 ते 35 वयोगटातील आहेत. रस्ते अपघातात 1,52,780 लोक ठार झाले, तर 4,46,518 लोक जखमी झाले. सर्व प्रयत्न करूनही त्यांचे मंत्रालय असे अपघात कमी करण्यात अयशस्वी ठरल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. तसेच अपघातांच्या संख्येत 29% घट आणि मृतांची संख्या 30% कमी केल्याबद्दल त्यांनी तामिळनाडू सरकारचे कौतुक केले. (हेही वाचा: रस्ते अपघात रोखण्यासाठी राज्यात वाहानांच्या वेगावर मर्यादा, 18 नोव्हेंबर पासून नवे नियम लागू होणार)

यापूर्वी समोर आलेल्या अहवालांनुसार जानेवारी, मे, एप्रिल, मार्च आणि डिसेंबर हे अपघात होण्याचे सर्वात धोकादायक पाच महिने आहेत. जानेवारी ते मे 2018 दरम्यान भारतात सर्वाधिक रस्ते अपघात झाले. यामध्ये जानेवारीत 40,606, मेमध्ये 40,163, एप्रिलमध्ये 38,718, मार्चमध्ये 38,213 आणि डिसेंबरमध्ये 37,470 रस्ते अपघातांचा समावेश आहे. त्यापैकी जानेवारीत बहुतेक रस्ते अपघातांचे कारण धुके होते. त्याच वेळी, मे मध्ये हे कारण उष्मा असल्याचे मानले जात होते. यातील बहुतेक अपघात सकाळी सहा ते नऊ या दरम्यान झाले. जसजसा दिवस वाढत गेला तसतसे अपघातांचे प्रमाण वाढत गेले. पंजाब, उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये सर्वाधिक अपघात झाले आहेत.