रस्ते अपघात रोखण्यासाठी राज्यात वाहानांच्या वेगावर मर्यादा, 18 नोव्हेंबर पासून नवे नियम लागू होणार
Mumbai Pune Expressway (Photo Credits-Facebook)

राज्यात दिवसेंदिवस रस्ते अपघात वाढत चालल्याने त्याबाबत दक्षता घेण्यासाठी पावले उचलली जात आहेत. तसेच वाहनांच्या वेगावर नियंत्रण असावे हे वारंवार सांगून सुद्धा त्याकडे दुर्लक्ष केले जाते. मात्र आता 18 नोव्हेंबर पासून वाहनांच्या वेगावर मर्यादा आणणार असून त्या संदर्भात नियम लागू होणार आहे. पश्चिम द्रुतगती मार्ग, चार मार्गिका रस्ते आणि महापालिकेच्या हद्दीमधील रस्त्यांवरुन जर वाहनांच्या वेगाची मर्यादा न पाळल्यास चालकाच्या विरोधात कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे महामार्ग वाहतूक पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

द्रुतगती मार्गावर वाहानांची वेग मर्यादा यापूर्वी प्रतितास 120 किमीची मर्यादा 100 पर्यंत खाली आणली आहे. त्याचसोबत नऊपेक्षा पेक्षा जास्त सीटर असलेल्या वाहनांसाठी वेगाची मर्यादा 100 किमीवरुन 80 ठेवण्यात आली आहे. त्यामुळे आता जर एखाद्या चालकाने वेगाची मर्यादा पाळावी असे आवाहन करण्यात आले आहे. तर रस्ते सुरक्षा समितीने रस्ते अपघात आणि त्यामध्ये मृत होणाऱ्यांच्या संख्येत 10 टक्के घट झाल्यचे सांगितले आहे. राज्यातील रस्ते अपघाताबाबत बोलायचे झाल्यास जानेवारी ते ऑक्टोबर 2018 मध्ये एकूण 29,350 अपघात, 10 हजारांपेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली होती. तर 2019 मध्ये 27,363 अपघात आणि 10 हजारांपेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.(मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर वाहनाची वेगमर्यादा झाली 100 किमी प्रति तास; 18 नोव्हेंबरपासून नवा नियम लागू)

सध्या वेगाची मर्यादा एक्सप्रेस वे येथे प्रतितासाप्रमाणे आठपेक्षा कमी वाहनांसाठी 100 किमी, मालवाहतूक वाहनांसाठी 80 किमी ठेवण्यात आली आहे. तसेच महापालिका हद्दीमधील रस्त्यांसाठी आठपेक्षा कमी 70 किमी, मालवाहतूक वाहनांसाठी ,दुचाकी 60 किमी आणि तीन चाकी वाहनांसाठी वेगाची मर्यादा 50 किमी ठेवण्यात आली आहे.