Bigg Boss Marathi 2 | (Photo Credit : twitte / Colors Marathi)

Bigg Boss Marathi 2, 15 July, Episode 52 Updates: कॅप्टनसीसाठी समुद्रमंथन टास्कमध्ये बिग बॉसने घरातील स्पर्धकांसामोर एक मोठेच आव्हान ठेवले.  साष्टांग नमस्कार, चिखलात थांबने वैगेरे कार्य झाली. तर आता बिग बॉसने टास्क दिला आहे की, कॅप्टनसीसाठी उमेदवार असलेल्या रुपाली भोसले आणि वीणा जगताप यांनी आपल्या समर्थकांपैकी एक पुरुष आणि एक स्त्री अशा  प्रत्येकी दोन स्पर्धकांना म्हणजेच एकूण चार स्पर्धकांना घरातून कायमचे बाद होण्याच्या प्रक्रियेसाठी नॉमिनेट करायचे आहे. या टास्कमध्ये उमेदवारांसोबतच सर्वच स्पर्धकांची कसोटी लागली.

रुपाली भोसले झाली कॅप्टन

दरम्यान, रुपाली भोसले हिच्या वतीने माधव देवचक्के आणि शिवाणी सुर्वे तर, वीणा जगताप हिच्या वतीने माधव केळकर आणि वैशाली माडे हे  प्रत्येकी एका आठवड्यासाठी नॉमिनेट झाले. दरम्यान रुपाली भोसले हिला समुद्रमंथन कार्यात अधिक कलश मिळाले. त्यामुळे रुपाली भोसले ही या आठवड्यात घरातील कॅप्टन झाली.

सदस्यांच्या नावे उकळात मिरच्या टाका नावडत्या सदस्याला नॉमिनेट करा

अभीजित केळकर - नेहा शितोळे, हिना पांचाळ, माधव देवचक्के, किशोरी शहाणे

शिव ठाकरे - नेहा शितोळे, माधव देवचक्के, हिना पांचाळ, किशोरी शहाणे

किशोरी शहाणे - अभिजित केळकर, शिव ठाकरे, वैशाली माडे, वीणा जगताप

नेहा शितोळे - वैशाली माडे, शिव ठाकरे, हिना पांचाळ, वीणा जगताप

वीणा जगताप -  हिना पांचाळ, नेहा शितोळे, किशोरी शहाणे, माधव देवचक्के

शिवानी सुर्वे - विणा जगताप, किशोरी शहाणे, शिव ठाकरे, वैशाली माडे

माधव देवचक्के - वीणा जगताप, शिव ठाकरे, वैशाली माडे, अभिजित केळकर

वैशाली माडे - किशोरी शहाणे, नेहा शितोळे, माधव देवचक्के, शिवानी सुर्वे

हिना पांचाळ - वीणा जगताप, शिव ठाकरे, नेहा शितोळे, किशोरी शहाणे

रुपाली भोसले - शिव ठाकरे, वैशाली माडे, अभिजित केळकर, वीणा जगताप

वरील नावे पाहून ही कसली नावे असा विचार मनात आला असेल. पण, ही नावे आहेत बिग बॉसने दिलेल्या टास्कमधील. बिग बॉसने घरातील सदस्यांना टास्क दिला आहे की, घरात नको असलेल्या सदस्यांना घरातील सदस्यांनीच नॉमिनेट करायचे आहे. त्यासाठी घरातील सदस्याने आपल्याला नको असलेल्या सदस्याच्या नावे मिरच्या घेऊन त्या उकळात टाकायच्या आहेत.  त्यानुसार घरातील सदस्यांनी एकमेकांना नॉमिनेट केले. तिच नावे वर दिली आहेत.

आजच्या आठवड्यात नॉमिनेट झालेले सदस्य

आज्या आठवड्यासाठी नॉमिनेट झालेल्या सदस्यांची नावे आहेत किशोरी शहाणे, वीणा जगताप, शिव ठाकरे, वैशाली माडे, नेहा शितोळे, हिना पांचाळ, माधव देवचक्के.