Suryoday Perampalli's Son Dies: कन्नड चित्रपटाचे दिग्दर्शक सुर्योदय पेरामपल्ली यांच्या मुलाचा रस्ता अपघातात मृत्यू
Mayur Perampally ( Photo Credits : IANS )

कन्नड चित्रपटाचे दिग्दर्शक सुर्योदय पेरामपल्ली (Suryoday Perampalli) यांचा 20 वर्षीय मुलगा मयुर पेरामपल्ली (Mayur Perampalli) याचे अपघातात (Road Accident) मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना ब्यादरहल्ली पोलिसांच्या हद्दीत शनिवारी मध्यरात्री घडली आहे. या अपघातानंतर यांच्यासह अनेकांना मोठा धक्का बसला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयुर हा 300 सीसीची दुचाकी चालवत होता. त्याच्या दुचाकीने टॅंकरच्या मागील बाजूला जोरदार धडक दिली. ज्यात तो गंभीर जखमी झाला. दरम्यान, रुग्णालयात घेऊन जाताना त्याचा रस्त्यातच मृत्यू झाला. तो अधिक वेगाने दुचाकी चालवत असल्याचे पोलिसांना संशय आहे.

गेल्या एका महिन्यात कन्नड फिल्म इंडस्ट्रीचा हा तिसरा रस्ता अपघात आहे. यापूर्वी संचारी विजय यांचा जागीच मृत्यू झाला होता, तर दोन दिवसांपूर्वी प्रसिद्ध कन्नड अभिनेता आणि भाजप नेते जगेश यांचा मुलगा यतीराज यांचा अपघात निधन झाले होते. यानंतर दुचाकी अपघातात 20 वर्षीय मयूरचा मृत्यू झाला आहे. हे देखील वाचा- धक्कादायक! हुंडा मिळाला नाही म्हणून पतीने नवविवाहितेवर करवला मित्रांकडून सामुहिक बलात्कार; गुप्तांगाला मिरची व बाम लावून केले बेशुद्ध

पेरामपल्ली यांनी सुपहिट तुलु चित्रपटाचे निर्माण आणि निर्दशन केले आहे. यात 'देई बैदेठी - गेज्जेगिरी नंदनोडु', कोटि आणि चेन्नय्या की मां यांसारख्या चित्रपटाचा समावेश आहे. देई बैदेठी या चित्रपटाने तीन वेळा राज्य पुरस्कार जिंकले आहेत. या चित्रपटाच्या यशाने आनंदित असलेल्या पेरामपल्ली यांनी फेब्रुवारी 2021 मध्ये कॉमेडी-क्राइम थ्रिलर 'साल्ट' या कन्नड चित्रपटाचे दिग्दर्शनही केले.