धक्कादायक! हुंडा मिळाला नाही म्हणून पतीने नवविवाहितेवर करवला मित्रांकडून सामुहिक बलात्कार; गुप्तांगाला मिरची व बाम लावून केले बेशुद्ध
Gang rape (Image used for representational purpose)

राजस्थानच्या (Rajasthan) धौलपूरमध्ये (Dholpur) एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथे एका नवविवाहित महिलेने तिच्या पतीवर त्याच्या मित्रांद्वारे बलात्कार (Gang Rape) करवल्याचा आरोप केला आहे. तक्रार नोंदवताना महिलेने सांगितले की, लग्नानंतर तिला हुंडा आणता आला नाही, याच कारणास्तव पतीने तिला त्याच्या मित्रांच्या स्वाधीन केले. महिलेचा आरोप आहे की या बलात्काराच्या बदल्यात पतीने आपल्या मित्रांकडून पैसे घेतले. पोलिसांनी सांगितले की, या घटनेनंतर ती बेशुद्ध झाली होती. या तरुणांना विरोध केल्यामुळे नवऱ्याने गुप्तांगात मिरची आणि बाम लावून बेशुद्ध केले, असा आरोपही पीडितेने नवऱ्यावर केला आहे.

धौलपूरचे पोलिस उपअधीक्षक परवेन्द्र महेला यांनी दिलेल्या माहितीनुसार, या 23 वर्षीय पीडित मुलीचे 14 जानेवारी 2021 रोजी लग्न झाले होते. लग्नानंतर तिच्या सासरच्यांनी तिच्यावर हुंड्यासाठी दबाव आणण्यास सुरवात केली. हुंड्याची मागणी पूर्ण न झाल्याने नवरा आणि सासरच्यांनी तिला त्रास देत मारहाण करायला सुरुवात केली. पीडित महिलेने पोलिस स्टेशनमध्ये दिलेल्या अहवालात सांगितले की, 26 जून रोजी रात्री 12 च्या सुमारास तिचा नवरा अज्ञात तरुणाला घरी घेऊन आला होता.

या युवकाने तिच्या तोंडात कापडाचा बोळा घातला आणि पतीसमोरच तिच्यावर बलात्कार केला. पीडितेने सांगितले की, दुसऱ्या दिवशीही नवरा इतर काही लोकांना घरी घेऊन आला होता. या लोकांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. त्याआधी तिच्या गुप्तांगाला मिरची आणि बाम लावून तिला बेशुद्ध केले गेले. दोन दिवस तिच्यावर बलात्कार होत होता. (हेही वाचा: सांभाळ जिल्ह्यातील 19 वर्षीय तरूणीवर बलात्कार; घटनेचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर केला व्हायरल)

या घाबरलेल्या पीडित मुलीने घडलेली हकीकत कशीबशी आपल्या माहेरच्या लोकांना सांगितली. आपल्या मुलीसोबत घडलेली घटना ऐकताच तिच्या घरच्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. पीडितेचे पालक ताबडतोब तिच्या घरी पोहोचले आणि त्यांनी आपल्या मुलीसह पोलिस स्टेशन गाठले. तिथे त्यांनी जावई व अन्य आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी केली गेली. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरु आहे.