Uttar Pradesh Rape: सांभाळ जिल्ह्यातील 19 वर्षीय तरूणीवर बलात्कार; घटनेचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर केला व्हायरल
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

देशभरातून दररोज महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या (Rape Case) घटना समोर येत आहेत. महिला अत्याचार रोखण्यासाठी सरकारकडून अनेक प्रयत्न केले जात असताना उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) सांभाळ (Sambhal) जिल्ह्यातील एका घटनेने सर्वांना हादरून सोडले आहे. या परिसरातील मुलीवर बलात्कार करून या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी एका तरूणासह शेजारी राहणाऱ्या दोन महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पीडित मुलीला वैद्यकीय तपासणी करण्यासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

पीडित मुलगी हजरत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका खेड्यागावात राहते. पीडिताच्या वडिलांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, तिची मुलगी 26 जून रोजी गावतील दोन महिलांसह जंगलात चारा कापण्यासाठी गेली होती. त्यावेळी गावातील एका तरूणाने तिच्यावर बलात्कार केला आहे. एवढेच नव्हेतर, आरोपीने या घटनेचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावरही व्हायरल केला आहे, अशी माहिती सांभाळ पोलीस अधिकारी अरूण कुमार सिंह यांनी दिली आहे. यासंदर्भात इंडियन एक्स्प्रेसने वृत्त दिले आहे. हे देखील वाचा- Delhi Murder: दारूची तलब भागवण्यासाठी 45 वर्षीय व्यक्तीची केली हत्या, दिल्ली येथील 3 अल्पवयीन मुलांना अटक

अधिकाऱ्याने पुढे सांगितले की, आरोपी युवकावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच मुलीला घेऊन गेलेल्या दोन महिलांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी युवकास अटक करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पीडित मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.