शरद पवार (Sharad Pawa) हे 'घाशीराम कोतवाल' (Ghashiram Kotwal) या नाटकाच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. त्यामुळे विजय तेंडूलकर (Vijay Tendulkar) लिखीत 'घाशीराम कोतवाल' (Ghashiram Kotwal) हे नाट्य इतिहासातील ऐतिहासिक नाटक बर्लिन आंतरराष्ट्रीय महोत्सवात (Berlin Natya Mahotsav) पोहोचले, अशी आठवण प्रसिद्ध अभिनेते आणि मानसोपचारतज्ज्ञ मोहन आगाशे (Mohan Agashe) यांनी सांगितली आहे. ते एका खासगी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलत होते. मोहन आगाशे यांनी घाशीराम कोतवाल या नाटकाला झालेला विरोध, टीका वाद आणि या नाटकाचे घवघवीत यश यांबाबत तपशिलवार सांगितले. त्यामुळे मराठी रसिकांना घाशीराम कोतवाल नाटकाच्या आठवणी आणि नाटकासंबंधीच्या वादाच्या घटनांना पुन्हा एकदा उजाळा मिळाला. घाशीराम हे मराठी नाट्यसृष्टीतील अत्यंत यशस्वी, प्रतितयश आणि जमाजमन ढवळून टाकणारे नाटक ठरले आहे.
मोहन आघाशे यांनी सांगितले की, बर्लिनच्या आंतरराष्ट्रीय नाट्य महोत्सवाचे निमंत्रण घाशीराम कोतवाल नाटकाला आले. दरम्यान, कोणीतरी टूम काढली की या नाटकामुळे नानासाहेब फडणीस यांची बदनामी होईल. खरे तर घाशीराम कोतवाल नाटकाचे लेखक नाटककार विजय तेंडूलकर यांनी नाटकाच्या सुरुवातीलाच स्पष्ट केले आहे की, 'हे नाटक ऐतिहासिक नाही. हे केवळ एक नृत्य संगीतमय दंतकथा आहे. कोणाला पेशवाई अथवा इतर काही संदर्भ शोधायचे असतील तर संबंधीतांनी इतर ठिकाणी शोधा'. असे असले तरी घाशीराम बर्लिनला जावे की नाही याबाबत वाद सुरु होता. दरम्यान, त्यावेळच्या जनसंघ, हिंदू महासभा, शिवसेना या लोकांचा या नाटकाला विरोध होता.
घाशीराम कोतवाल नाटकाचा किस्सा पुढे सांगताना मोहन आगाशे पुढे म्हणाले, इंदिरा गांधी यांच्या मंत्रिमंडळातील तत्कालीन आयएमडी मंत्री वसंत साठे यांनी त्यावेळी एक विधान केले. ते म्हणाले, 'घाशीराम कोतवाल हे नाटक बर्लिनला पाठवणे म्हणजे देशाची प्रतिमा मलीन होण्यासारखे आहे'. त्यांच्या या विधानामुळे नाटकाच्या विरोधकांना एक बळ मिळाले. शरद पवार हे त्या वेळी विरोधी पक्ष नेते होते. (हेही वाचा, तब्बल 25 वर्षानंतर अमोल पालेकर यांचे रंगभूमीवर पुनरागमन; साकारणार 'ही' भूमिका, जाणून घ्या डीटेल्स)
पुढे बोलताना आगाशे म्हणाले, विविध विषयांत प्रचंड काम केलेल्या कमलादेवी चट्टोपाध्याय, पुपूला जयकर, कपीला वात्सायन या तिघींच्या समितीने आयसीसीला सूचवले होते की, 'घाशीराम कोतवाल हे नाटक बर्लिनला पाठवावे. त्यांनी इंदिरा गांधी यांना सांगितले की, आमच्या तिघींच्या समितीने हे सूचवले आहे की, हे नाटक बर्लिनला जावे. असे असताना आपल्याला जर हे नाटक जावे असे वाटत नसेल तर मग आमचा या समितीचा उपयोग काय?' ... आणि मग घाशीराम बर्लिनला जाण्याचा मार्ग मोकळा झाला.
दरम्यान, एक अवई उठली की मी (मोहन आगाशे), जब्बार पटेल किंवा महेश टीळेकर यांना पळवून नेणार. आमची गाडी पुणेहून विमानतळावर जाणार होती. या वेळी हा प्रकार घडणार. अशा वेळी शरद पवार त्यांचा दौरा सोडून पुण्याला आले. त्यांनी प्रसिद्ध उद्योगपती निळकंट कल्याणी यांच्याकडे मला बोलवून घेतले. डॉ. वाटवे त्या वेळी माझ्या सोबत होते. ते म्हणाले, 'ही वेळ स्ंटट करण्याची नाही. बर्लिनला पोहोचणे महत्त्वाचे आहे. ही विमानाची 25 तिकीटे आहेत. पुणे ते मुंबई. ही तिकीटं घ्या आणि उद्या तुम्ही कोणालाही न सांगता परस्पर विमानतळावर या. बाकीचे लोक गाडीने विमानतळावर येतील.' मग आम्ही घरी कोणालाही न सांगता विमानतळावर पोहोचलो. आम्ही मुंबईला पोहोचलो. तिथून पुढे आम्ही बर्लिनला पोहोचलो.
आम्ही बर्लिन दौर करुन परत आलो तेव्हा मात्र चित्र प्रचंड बदलले होते. आमच्या स्वागतासाठी लाल गालिचा (रेड कार्पेट) होता. त्यावेळचे मुंबईचे दिलीप कुमार, शरद पवार, स्मिता पाटील यांचे वडील, स्वत: स्मिता पाटील स्वागत करण्यासाठी उपस्थित होते. त्यानंतर या नाटकाचे जगभरात प्रयोग झाले. भारतातही हे नाटक तुफान चालले, अशी आठवणही मोहन आगाशे यांनी सांगितली.