ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर (फोटो सौजन्य-फेसबुक)

दिग्गज अभिनेते व दिग्दर्शक अमोल पालेकर (Amol Paleka) rतब्बल 25 वर्षानंतर रंगमंचावर आगमन करत आहेत. 'कुसूर' (Kusur) या हिंदी थ्रिलर नाटकामध्ये ते दिसणार आहेत. संध्या गोखले यांनी ‘कुसुर’ हे नाटक लिहिले आहे. सोबतच संध्या गोखले (Sandhya Gokhale) यांनी अमोल पालेकर यांच्यासह संयुक्तरित्या या नाटकाचे दिग्दर्शन केले आहे. या नाटकात अमोल पालेकर निवृत्त एसीपी दंडवतेच्या भूमिकेत दिसणार आहे. नाटकाविषयी बोलताना अमोल पालेकर म्हणाले, ‘वेगवान धावणारी कहाणी आपल्याला अनेक प्रकारे विचलित करते. तसेच, आपल्या अपेक्षांच्या अगदी विरोधी गोष्टी घडत असतात. तसेच यामुळे आपली अनेक समजुती बदलतात. सखोल विषय अगदी शेवटचा पडदा पडू पर्यंत आपल्या आपल्या अंतःकरणात भिनलेला असतो, अगदी तसेच हे नाटक आहे.’

24 नोव्हेंबरला अमोल पालेकर 74 वर्षांचे होतील. टाटा थिएटर, एनसीपीए, मुंबई येथे त्याच दिवशी या नाटकाचा प्रीमियर होणार आहे. 1971 मध्ये अमोल पालेकर यांनी आपल्या चित्रपटाच्या कारकिर्दीची सुरुवात एका मराठी चित्रपटाने केली. यानंतर त्यांनी बॉलिवूडकडे आपला मोर्चा वळविला. 1974 मधील बासु चॅटर्जी यांच्या 'रजनीगंधा’ चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनाला भुरळ घातली. अमोल पालेकर यांनी दिग्दर्शक म्हणून अनेक चित्रपट केले, ज्यात कच्छी धूप, नकाब आणि पहेली सारख्या चित्रपटांचा समावेश होता. (हेही वाचा: मराठी रंगभूमी दिन निमित्त 'ही' पाच चर्चेतील धम्माल मराठी नाटकं आवर्जून पाहा)

कुसूर हे नाटक डॅनीश फिल्म 'Den Skyldige; चे हिंदी रुपांतर असणार आहे. या नाटकाद्वारे संध्या गोखले मुंबईसारख्या आधुनिक भारतीय शहरातील समकालीन जीवनातील बहु-सांस्कृतिक गुंतागुंत सदर करणार आहेत. दरम्यान, अमोल पालेकर यांनी सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्स, मुंबई येथे ललित कलांचा अभ्यास केला आणि चित्रकार म्हणून कारकीर्द सुरू केली. एक चित्रकार म्हणून नावारूपास आल्यानंतर ते मोठ्या पडद्याकडे वळले. अमोल पालेकर यांना आतापर्यंत त्यांच्या अभिनयासाठी 5 वेळा राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.