Ashok Saraf : अशोक सराफ यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर; अभिनेत्री ऋतुजा बागवेचाही सन्मान
Ashok Saraf | Twitter

ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) आणि प्रसिद्ध शास्त्रीय गायिका कलापिनी कोमकली (Kalapini Komkali) यांना संगीत नाटक अकादमीच्यावतीने पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.  संगीत, नृत्य, नाट्य क्षेत्रांत अमूल्य योगदान दिल्याबद्दल संगीत नाटक अकादमीतर्फे (Sangeet Natak Academy) दिल्या जाणाऱ्या ​फेलोशिप आणि पुरस्कारांची आज घोषणा करण्यात आली.  केंद्र शासनाच्या सांस्कृतिक मंत्रालयांतर्गत कार्यरत संगीत नाटक अकादमी दरवर्षी संगीत, नृत्य, नाट्य आणि लोककला क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान देणाऱ्या कलाकारांना सन्मानित केले जाते. (हेही वाचा - Maharashtra Bhushan Purskar: ज्येष्ठ अभिनेचे अशोक सराफ यांना महाराष्ट्र भुषण पुरस्कार, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हातून सन्मान)

संगीत नाटक अकादमीतर्फे नृत्य, नाट्य आणि संगीत क्षेत्रात अमूल्य योगदान देणाऱ्या कलाकारांचा गौरव करण्यात येतो.  यामध्ये महाराष्ट्रातील कलाकारांचा समावेश आहे.  यामध्ये अशोक सराफ यांच्यासह ढोलकीवादनासाठी विजय शामराव चव्हाण यांना आणि अभिनयासाठी ऋतुजा बागवेला पुरस्कार मिळाला आहे.

संगीत नाटक अकादमी पुरस्कार विजेते

- अशोक सराफ, अभिनय

- विजय शामराव चव्हाण, ढोलकीवादक

- कलापिनी कोमकली, हिंदुस्तानी शास्त्रीय सगीत

- नंदिनी परब गुजर, सुगम संगीत

- सिद्धी उपाध्ये, अभिनय

- महेश सातारकर, लोकनृत्य

- प्रमिला सूर्यवंशी, लावणी

- अनुजा झोकरकर, हिंदुस्तानी शास्त्रीय गायक

- सारंग कुलकर्णी, सरोद वादक

- नागेश आडगावकर, अभंग संगीत

- ऋतुजा बागवे, अभिनय

- प्रियांका शक्ती ठाकूर, पारंपारिक कला