संतोष देशमुख हत्या (Santosh Deshmukh Murder) प्रकरण, बीडमधील कायदा व सुव्यवस्था यांबाबत बोलताना भाजप आमदार सुरेश धस (MLA Suresh Dhas) यांनी केलेल्या टीप्पणीचा अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) यांनी निशेष केला आहे. धस यांनी केलेल्या वक्तव्यावर कायदेशीर कारवाई करावी यासाठी माळी यांनी राज्य महिला आयोगाकडेही (Maharashtra State Commission for Woman) तक्रार केली आहे. दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी अशा लोकप्रतिनिधींच्या वक्तव्यांची गांभीर्याने दखल घ्यावी, असे अवाहन करतानाच आमदार धस यांनीही जाहीरपणे आपली माफी मागावी, अशी मागणी प्राजक्ता माळी यांनी केली आहे. दरम्यान, इतरही कायदेशीर कारवाई करण्याबाबत प्राजक्ता माळी यांनी इशारा दिला.
करुणा मुंडे यांना अवाहन
साधारण दीड महिन्यांपूर्वी करुणा मुंडे यांनी प्राजक्ता माळी यांचे नाव घेऊन काही वक्तव्ये केली आहेत. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या व्हिडीओमध्ये अभिनेत्री माळी आणि मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचा संबंध जोडण्यात आला होता. ज्यामुळे सोशल मीडियावरही प्रचंड ट्रोलिंग झाले. दरम्यानच्या काळात प्राजक्ता माळी यांनी मौन धारण केले होते. मात्र, आमदार सुरेश धस यांनी केलेल्या वक्तव्यानंतर त्या आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. या पार्श्वभूमीवर बोलताना, करुणा मुंडे यांनी चुकीच्या माहितीच्या आधारे वक्यव्य करु नये, असे अवाहन माळी यांनी केले. तसेच, त्यांनी केलेल्या वक्तव्यानंतर आपण त्यांना नोटीस पाठवली आहे, असेही त्या म्हणाल्या. (हेही वाचा - Santosh Deshmukh Case: संतोष देशमुख हत्या प्रकरण, आतापर्यंत काय घडले? देवेंद्र फडणवीस सभागृहात काय म्हणाले?)
काय म्हणाल्या प्राजक्ता माळी?
टबीड जिल्ह्यातील माननीय आमदार श्री सुरेश धस यांनी काल प्रसारमाध्यमांशी बोलताना जी काही टीप्पणी केली. त्याबद्दल तीव्र निशेष व्यक्त करण्यासाठी मी आपणासबोलावले आहे. पाठिमागील दीड महिन्यांपासून हा प्रकार सुरु आहे. या दीड महिन्यांपासून मी माझ्यावरील ट्रोलिंग, टीका, टीप्पणी मी शांतपणे पाहात आहे. ही शांतता म्हणजे त्याला माझी असलेली मूक संमती नाही. राज्यभरातील अनेक महिला, अभिनेत्री यांची हतबलता आहे. कोणीतरी एखादी व्यक्ती संतापच्या भरात एखादे वाक्य बोलते आणि त्यावरुन चिखलफेक होते. हळूहळू सगळेच बोलत जातात आणि महिलांवर शेरेबाजी होते', असे प्राजक्ता माळी यांनी म्हटले आहे. त्या आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होत्या. (हेही वाचा, 'गलिच्छ राजकारणात आमच्या कलाक्षेत्रातील माता-भगिनींना ओढू नका'; मनसे नेते अमेय खोपकर यांचा आमदार सुरेश धस यांना इशारा)
कुटुंब आणि कलाकारांकडून पाठिंबा
पुढे बोलताना प्राजक्ता माळी म्हणाल्या, एका जाहीर कार्यक्रमातील सत्कारात झालेल्या केवळ दीड मिनीटांच्या भेटीवरुन इतके सगळे आरोप आणि टीका केली जाते. या सर्व बाबींना मी उत्तर का द्यायचे? मी पाठिमागील विविध वर्षांपासून ज्या क्षेत्रामध्ये आहे त्या क्षेत्रातील माझा संच, माझे कुटुंबीय यांनी मला प्रचंड धीर दिला. त्यामुळे शांत होते. त्या सर्वांनी मला सांगितले की, अशा वावड्या उठत असतात निघून जात. असे सांगत या सर्वांनी मला धीर दिला. पण, असे असले तरी, एक लोकप्रतिनिधी काहीतरी बोलतो, आपल्यावर चिखलफेक करतो तेव्हा मात्र, मी त्याला सामोरे जाणे गरजेचे आहे. सुरेश धस यांनी जर माझ्याबद्दल वक्तव्य केले नसते तर, मी आज प्रसारमाध्यमांसमोर आले नसते. कारण तशीही मी शांतच होते. (हेही वाचा, Santosh Deshmukh Murder Case: संतोष देशमुख हत्येची चौकशी होईपर्यंत पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्या; बीड मूक मोर्चा आंदोलकांची मागणी)
'तुमचं राजकारण तुम्हाला लख लाभ'
माझा एक प्रश्न आहे, सुरेश धस यांना, तुम्ही राजकारणी आहात, तुमचं राजकारण तुमच्या राजकारणातील टीका-टीप्पणी करता, तुमचं राजकारण तुम्हाला लख लाभ. पण, त्यात महिला कलाकारांना का ओढता? तुम्ही बीड मधील काही कार्यक्रमांबाबत बोलताना इव्हेंट मॅनेजमेंट शिकायचे असेल तर यांच्याकडून शिका असे म्हटले. आपण राजकीय नेता म्हणून असे बोलूच कसे शकता? या ठिकाणी अनेक पुरुष कलाकारही येतात. त्या कलाकारांबद्दल आपण का नाही बोलत आहात? केवळ महिला आहे म्हणूनच तुम्ही असे का बोलता? असा सवाल प्राजक्ता माळी यांनी उपस्थित केला.
एखादी महिला कोणत्याही पुरुषाची मदत न घेता स्वत:च्या पायावर उभी राहू शकते. ती प्रगती करु शकते. हे तुम्हाला पचत का नाही? का तुम्हाला हे मान्य नाही. तुमच्या या टीप्पणीमुळे केवळ महिला, महिला कलाकारच यांचाही अपमान आहे. त्यातून तुमची मानसिकता दिसते, असेही प्राजक्ता माळी यांनी म्हटले.