Dhananjay Munde, Pankaja Munde | (Photo Credit: Archived, edited, representative images)

Santosh Deshmukh Murder Case: संतोष देशमुख हत्या प्रकरणी (Santosh Deshmukh Murder Case) बीड जिल्ह्यातील सर्वपक्षीय संघटना तसेच मराठा समाजातील संघटनांनी आज मूक मोर्चाचे आयोजन केले आहे. यामध्ये आंदोलकांनी संतोष देशमुख यांच्या हत्तेची संपूर्ण चौकशी होईपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) व भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) मंत्रिमंडळात असता कामा नये म्हणूनच त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची काही दिवसापूर्वी हत्या करण्यात आली होती. सदर हत्तेमागे अनेक बड्या नेत्यांचे हात असल्याची चर्चा राज्यभर सुरू आहे.

नागपूर हिवाळी अधिवेशनात सुरेश धस यांनी उठवला आवाज -

दरम्यान, बीड जिल्ह्यातील आमदार सुरेश धस यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनात आवाज उठवला होता. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून हत्येमागे कोणत्याही पक्षाचा कितीही मोठा नेता असला तरी कोणालाही सोडणार नसल्याचं म्हटलं होतं. तथापी, देशमुख यांची हत्या करणारे काही मारेकरी मोकाट असून त्यामागे बीड जिल्ह्यातील मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांचा हात असल्याचे आरोप करण्यात येत आहे. (हेही वाचा - Santosh Deshmukh Case: संतोष देशमुख हत्या प्रकरण, आतापर्यंत काय घडले? देवेंद्र फडणवीस सभागृहात काय म्हणाले?)

सुरेश धस यांची नाव न घेता वाल्मीक कराड यांच्यावर टीका -

सुरेश धस यांनी अप्रत्यक्षरीत्या नाव न घेता वाल्मीक कराड हेच हत्या मधील सूत्रधार असल्याचा दावा केला होता. त्यांना तात्काळ अटकेची मागणी देखील त्यांनी केली होती.

वाल्मीक कराड यांच्यावर असा आरोप झाल्यामुळे बीड जिल्ह्यामध्ये त्यांच्या समर्थकांनी देखील आवाज उठवला होता. परंतु, वाल्मीक कराड यांच्यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील अनेक आरोप केले असून त्यांच्यावर असलेल्या असंख्य गुन्हे बाहेर काढून कराड यांना अटक करण्यास भाग पाडू, असे म्हटले होते. (हेही वाचा - Santosh Deshmukh Murder: संतोष देशमुख यांच्या कुटुंबास शरद पवार यांची भेट, उचलली मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी)

बीड जिल्ह्यातील या प्रकरणामुळे मराठा ओबीसी आमने-सामने येथील व राज्यातील कायदा सुव्यवस्था पुन्हा एकदा बिघडेल, अशी भीती बीड मधील स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.