US And UK Strikes Against Iran-backed Houthis: अमेरिका आणि इंग्लंडकडून लाल समुद्रातील हल्ल्यांना प्रत्युत्तर,  येमेनमध्ये इराण समर्थित हौती गटावर मोठी कारवाई (Watch Video)
US, and UK Strikes | (Photo credit: X)

युनायटेड स्टेट्स (United States) आणि युनायटेड किंगडम (UK), ऑस्ट्रेलिया, बहारीन, कॅनडा आणि नेदरलँड्ससह सहयोगी देशांनी एकत्र येत परस्पर सहकार्यातून येमेन-नियंत्रित भागात विविध हौथी (Houthi) लक्ष्यांवर लष्करी हल्ले सुरू केले आहेत. यूनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका (US) जो बाइडेन (Joe Biden) यांनी आगोदरच दिलेल्या इसाऱ्यानंतर हे हल्ले सुरु झाल्याचे बोलले जात आहे. बायडेन यांनी यापूर्वी म्हटले होते की, इराण-समर्थित हौथी गटाला लाल समुद्रातील (Red Sea) व्यावसायिक जहाजांवर (Commercial Shipping) सुरू असलेल्या ड्रोन (Drone Attacks) आणि क्षेपणास्त्र (Missile Attacks) हल्ल्यांचे परिणाम भोगावे लागतील.

आंतरराष्ट्रीय सागरी जहाजांवर हौथीकडून झालेल्या हल्लांना थेट प्रत्युत्तर

सीएनएनने दिलेल्या वृत्तानुसार, यूएस राष्ट्राध्यक्ष जो बाइडेन यांनी म्हटले आहे की, हे हल्ले लाल समुद्रातील आंतरराष्ट्रीय सागरी जहाजांवर हौतीकडून झालेल्या हल्लांना थेट प्रत्युत्तर म्हणून करण्यात येत आहेत. लाल समूद्रातील मार्ग हा जगभरातील सर्वात महत्त्वाच्या जलमार्गांपैकी एक आहे. ज्याचे स्वातंत्र्य धोक्यात आणण्यासाठी हौथी बंडखोर प्रयत्न करत आहेत. त्यामुळे हे हल्ले थांबविण्यासाठी आणि जलमार्ग आणि त्यावरुन प्रवास करणाऱ्या लोकांचे संरक्षण करण्यासाठी गरज भासल्यास आंतरराष्ट्रीय व्यापाराचा मुक्त प्रवाह सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक ते सर्व उपाययोजना केल्या जातील.  (हेही वाचा, Ship Hijack Danger Video: लाल समुद्रात इस्रायली जहाजाचे अपहरण झाल्याचे दाखवणारा व्हिडिओ जारी)

आंतरराष्ट्रीय जलमार्गावर होणारे हल्ले चिंतेची बाब

आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यांनी आपापल्या वृत्तामध्ये म्हटले आहे की, लाल समूद्रात जहाजांवर होत असलेले वारंवारचे हल्ले हे जगातील महत्त्वाच्या जलमार्गांपैकी एकाला असलेल्या धोक्याबद्दल जागतिक चिंता दर्शवते. ही चिंता दूर करण्यासाठी हौथी हल्लेखोरांना पायबंध घालणे आवश्यक आहे. असे असले तरी, प्रादेशिक तणाव टाळण्यासाठी येमेनमध्ये थेट हल्ले टाळण्यास प्राधान्य दिले जात आहे. निश्चित ठिकाणे लक्ष्य करुनच हे हल्ले केले जात असल्याचेही या वृत्तांमध्ये म्हटले आहे. (हेही वाचा, MV Saibaba Suffers Drone Attack In Red Sea: गेल्या 24 तासांत भारतीय जहाजावर दुसरा ड्रोन हल्ला; लाल समुद्रात MV Saibaba जहाजाला करण्यात आलं लक्ष्य)

हल्ल्यांमध्ये लढाऊ विमाने आणि टॉमहॉक क्षेपणास्त्रांचा समावेश

अधिक माहिती अशी की, युनायटेड स्टेट्सने इराक आणि सीरियामध्ये इराणी प्रॉक्सींविरूद्ध हल्ले केले आहेत. तर येमेनमधील हौथी गटावर हा पहिला ज्ञात हल्ला झाला आहे. या हल्ल्यांमध्ये लढाऊ विमाने आणि टॉमहॉक क्षेपणास्त्रांचा समावेश केला गेला. ज्यांनी लाल समुद्रातील जहाजांवरील गटाच्या सतत हल्ल्यांमध्ये डझनभर हौथी साइट्सना लक्ष्य केले गेले. यामध्ये रडार सिस्टीम, ड्रोन स्टोरेज आणि लॉन्च साइट्स, बॅलिस्टिक मिसाइल स्टोरेज आणि लॉन्च साइट्स, तसेच क्रूझ मिसाइल स्टोरेज आणि लॉन्च साइट्स यांचा समावेश होता.

व्हिडिओ

एका वरीष्ठ लष्करी अधिकाऱ्याच्या हवाल्याने सीएनएनने दिलेल्या वृत्तानुसार, हल्ल्यांमध्ये होणारे नुकसान कमी करण्यासाठी अचूक-मार्गदर्शित शस्त्रास्त्रांचा वापर करत स्ट्राइकच्या निश्चिततेवर जोर देण्यात आला. यूएसएस फ्लोरिडाची एक मार्गदर्शित क्षेपणास्त्र पाणबुडी, टॉमहॉक जमिनीवर हल्ला करणारी क्षेपणास्त्रे गोळीबार ऑपरेशनचा एक भाग होती. प्रत्युत्तरादाखल केलेल्या हल्ल्यात हौती गटाचे नेमके किती नुकसान झाले याबाबत अद्याप निश्चिती नाही. मात्र, प्रत्युत्तर अगदी यशस्वी झाल्याचा दावा या अधिकाऱ्याने केला आहे.