Ship प्रतिकात्मक प्रतिमा (फोटो सौजन्य - ANI/X)

Saibaba Suffers Drone Attack In Red Sea: लाल समुद्रात (Red Sea) भारतीय ध्वजांकित जहाजावर ड्रोन हल्ला (Drone Attack On Indian Flag Ship) करण्यात आला आहे. या जहाच्या क्रूमध्ये 25 भारतीय होते. हल्लेखोरांनी लाल समुद्रातील एमव्ही साईबाबा जहाजाला लक्ष्य केले आहे. अमेरिकन लष्कराच्या म्हणण्यानुसार, हल्ला ड्रोन हुथी दहशतवाद्यांनी उडवला होता. गॅबॉनच्या मालकीच्या टँकर एमव्ही साईबाबाला हल्ल्यात कोणतीही दुखापत झाली नाही, असे यूएस सेंट्रल कमांडने सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे. भारतीय नौदलाच्या अधिकाऱ्यांनीही जहाजावरील 25 भारतीय सुरक्षित असल्याची पुष्टी केली.

दरम्यान, यूएस सेंट्रल कमांडने असा दावा केला होता की हौथींच्या हल्यात आलेल्या दोन युद्धनौकांपैकी एकावर भारताचा ध्वज होता. तथापि, भारतीय नौदलाने एक निवेदन जारी करून हे स्पष्ट केले की, हे जहाज गॅबॉन-ध्वजांकित आहे आणि त्याला भारतीय शिपिंग रजिस्टरकडून प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. (हेही वाचा - France: फ्रान्समध्ये थांबवण्यात आले 303 भारतीयांना घेऊन जाणारे विमान; मानवी तस्करीचा संशय)

निवेदनानुसार, स्थानिक वेळेनुसार दुपारी 3 ते 8 च्या दरम्यान, USS Laboon (DDG 58) दक्षिणेकडील लाल समुद्रात गस्त घालत होते. दरम्यान, येमेनमधील हुथी-नियंत्रित भागातून येणारे चार ड्रोन जहाजावर पाडण्यात आले. या ड्रोनचे लक्ष्य यूएसएस लॅबून होते. या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा नुकसान झाले नाही. स्थानिक वेळेनुसार रात्री आठच्या सुमारास अमेरिकेच्या नौदल दलाच्या सेंट्रल कमांडला दक्षिण लाल समुद्रातील दोन जहाजांवरून हल्ला झाल्याची माहिती मिळाली. विधानानुसार, नॉर्वेजियन ध्वजांकित तेल टँकर M/V Blamenen ला Houthi विद्रोही ड्रोनने लक्ष्य केले. परंतु, यात जहाजावर कोणतीही दुखापत किंवा नुकसान झाले नाही. त्यानुसार आणखी एका भारतीय ध्वजांकित तेल टँकर ‘एम/व्ही साईबाबा’वरही ड्रोन हल्ला झाला. या हल्ल्यात कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही.

याच्या एक दिवस आधी हिंदी महासागरातील एका जहाजालाही ड्रोन हल्ल्याला सामोरे जावे लागले होते. यामध्ये क्रूमध्ये 20 भारतीयही होते. गेल्या 24 तासांत भारतीय कर्मचाऱ्यांसह जहाजावर झालेला हा दुसरा ड्रोन हल्ला आहे. पहिला हल्ला अरबी समुद्रात झाला आणि आता दुसरा हल्ला लाल समुद्रात झाला. तथापी, अरबी समुद्रात सुमारे 217 सागरी मैल दूर असलेल्या पोरबंदर किनार्‍याजवळ एका व्यापारी जहाजावर शनिवारी संशयित ड्रोन हल्ला झाला. जहाजाच्या चालक दलात 21 भारतीयांचा समावेश होता. पण, या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. भारतीय लष्कराच्या सूत्रांनी आणि एका सागरी सुरक्षा संस्थेने ही माहिती दिली. (हेही वाचा - Karnataka: मच्छिमारांची बोट समुद्राच्या मध्यभागी उलटली, आठ जणांना वाचवण्यात यश)

इराण-समर्थित हुथी बंडखोरांनी इस्रायल-हमास संघर्षाच्या दरम्यान लाल समुद्रातील जहाजांवर हल्ले वाढवले ​​असताना ही घटना घडली आहे. युनायटेड किंगडम मेरीटाइम ट्रेड ऑपरेशन्स (UKMTO) ने या घटनेची माहिती दिल्यानंतर, नौदलाचे P-8I सागरी गस्ती विमान जहाज आणि त्याच्या क्रूच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले असल्याचे सूत्रांनी सांगितले. विमानाने एमव्ही केम प्लुटो हे जहाज आणि त्यातील कर्मचारी सुरक्षित असल्याचे सांगितले.

भारतीय नौदल मदतीसाठी तैनात

भारतीय नौदलाने व्यापारी जहाजाच्या मदतीसाठी एक आघाडीची युद्धनौका पाठवली आहे तर भारतीय तटरक्षक दलानेही कारवाई केली आहे. त्यांचे जहाज ICGS विक्रम घटनास्थळी पाठवले आहे. ब्रिटनच्या रॉयल नेव्हीच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या UKMTO ने सांगितले की, त्यांना एका जहाजावर ड्रोन हल्ला झाल्याची बातमी मिळाली होती. ज्यामुळे स्फोट आणि आग लागली. ही घटना भारताच्या नैऋत्येस 200 नॉटिकल मैलांवर घडली. आग विझवण्यात आली असून कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे त्यांनी सांगितले. हे जहाज सौदी अरेबियातील बंदरातून कच्चे तेल घेऊन मंगळुरु बंदरात जात होते.