Airlines | Representational Image | (Photo Credits: stux/Pixabay)

तालिबान सरकारने (Taliban Government) अफगाणिस्तानमध्ये विमान सेवा सुरु करण्यासाठी भारताला अपील केले आहे. यासाठी तालिबानने डीजीसीएला एक पत्र सुद्धा लिहिले आहे. नव्या तालिबानच्या सरकारच्या नेतृत्वात काम करणाऱ्या अफगाणिस्तान नागरिक उड्डाण प्राधिकरणाने भारताच्या डीजीसीएला विमान सेवेबद्दल पत्र लिहिले. अफगाणिस्तानने आपली विमानसेवा एअर आणि एरियाना अफगाण एअरलाइन्सद्वारे दिल्लीसाठी उड्डाणे पुन्हा सुरु करण्याची मागणी केली आहे.(UAE First Hindu Temple: अबू धाबी येथे उभारले जात आहे पहिले हिंदू मंदिर; 1000 वर्षे टिकेल, जाणून घ्या वैशिष्ठ्ये Watch Video)

इंडियन एक्सप्रेस द्वारे संपर्क केल्यानंतर DGCA प्रमुख अरुण कुमार यांनी पत्राची पुष्टी केली आहे. त्यांनी असे म्हटले की, नागरिक उड्डाण मंत्रालय यावर निर्णय घेईल. कारण हा एक धोरणाचा मुद्दा आहे. तालिबानने अफगाणिस्तानावर ताबा मिळवल्यानंतर अफगाणिस्तान विमानतळ क्षेत्राला अनियंत्रित क्षेत्र म्हणून जाहीर केले होते. त्यानंतर नागरिक उड्डाणे काही काळासाठी बंद केली गेली. त्यानंतर तालिबानने कतरच्या मदतीने काबुलसह देशातील काही विमानतळे पुन्हा सुरु करण्यास यश मिळवले.

एरियाना अफगाण एअरलाइन्स आधीपासूनच देशांअंतर्गत विमानसेवेचे संचनल करत आहे. तालिबानने ताबा मिळवल्यानंतर पहिले आंतरराष्ट्रीय उड्डाण 13 सप्टेंबर रोजी पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सद्वारे इस्लामाबाद आणि काबुल दरम्यान सुरु झाली होती. सध्या काबुल मध्ये पाकिस्तान आणि ईराणसाठी नियमित आंतरराष्ट्रीय उड्डाणे होत आहेत.(US: नोव्हेंबर पासून अमेरिकेच्या प्रवासासाठी राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांच्याकडून नवे नियम जाहीर)

अफगाणिस्तानचे डीजीसीए आणि वाहतूक मंत्री अल्हज हमीदुल्लाह अखुंदजादा यांनी अरुण कुमार यांच्या नावाने लिहिलेल्या पत्रात म्हटले की, या पत्राचे उद्दिष्ट स्वाक्षरी केलेल्या सामंजस्य करारावर आधारित दोन्ही देशांमधील प्रवास सुरळीत राखण्यासाठी आहे. त्यामुळेच अफगाणिस्तान नागरी उड्डयन प्राधिकरण तुम्हाला उड्डाणे सुलभ करण्याची विनंती करते असे त्यांनी म्हटले आहे.

तालिबान मंत्र्यांच्या या पत्राला अद्याप अधिकृत उत्तर देण्यात आलेले नाही. तर अफगाणिस्तानातून अमेरिकेच्या सैन्याने माघार घेतल्यानंतर काबुल मधील विमानतळ भारतासह काही देशांसाठी, लोकांना तेथून निघण्यासाठीचा मुख्य मार्ग होता. तालिबानने ताबा मिळवण्यापूर्वी भारताकडून एअर इंडिया आणि स्पाइसजेट दिल्ली आणि काबुल दरम्यान उड्डाण सेवा सुरु होती. स्पाइस जेटने कोरोनाच्या काळात आणि एअर इंडियाने 15 ऑगस्ट नंतर आपली सेवा बंद केली होती.