Proposed Model of Ram Temple (Photo Credits: Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra)

संयुक्त अरब अमिरातीची (UAE) राजधानी अबू धाबी (Abu Dhabi) येथे एक हिंदू मंदिर (First Hindu Temple) बांधले जात आहे. यूएईमध्ये उभारले जात असणारे हे पहिले पारंपरिक हिंदू मंदिर असेल. या ठिकाणी अयोध्या राम मंदिराच्या धर्तीवर मंदिर उभारले जात आहे. बीएपीएस हिंदू मंदिर अबू धाबी प्रकल्पाचे सदस्य यांनी दावा केला आहे की, या मंदिराचे वय सुमारे 1000 वर्षे आहे, म्हणजेच हे मंदिर एक हजार वर्षे उभे राहील. अहवालानुसार, मंदिराच्या बांधकामाचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे.

अबू धाबीमध्ये 'अल वक्बा' नावाच्या ठिकाणी 20,000 चौरस मीटर क्षेत्रावर हे मंदिर बांधले जात आहे. अल वक्बा, महामार्गाला लागून, अबू धाबीपासून 30 मिनिटांच्या अंतरावर आहे.

माध्यमांशी बोलताना प्रकल्पाच्या सदस्यांनी मंदिराशी संबंधित माहिती देताना सांगितले की, मंदिराच्या पायाभरणीचे काम पूर्ण झाले आहे. भारतातून कारागीर आल्यानंतर गुलाबी दगडांची स्थापना देखील पूर्ण होईल. प्रकल्पाचे सदस्य म्हणतात की हे मंदिर अत्यंत मजबूत असेल आणि ते जमिनीच्या खाली एक मीटर पर्यंत आहे. प्रकल्पाचे स्ट्रक्चरल इंजिनीअर Dr Kong Sia Keong यांनी सांगितले की, ते पहिल्यांदा अशा प्रकल्पावर काम करत आहेत जो किमान 1000 वर्षे टिकेल.

एका अहवालानुसार, या पारंपारिक दगडी मंदिराची अंतिम रचना आणि हाताने कोरलेल्या दगडी खांबांचे फोटो नोव्हेंबरमध्ये प्रसिद्ध करण्यात आले होते. ते देशातील राजस्थान आणि गुजरातमधील कलाकारांनी बनवले होते. यासह, अबुधाबीमध्ये बांधल्या जाणाऱ्या या हिंदू मंदिरामध्ये राजस्थानचा गुलाबी दगड आणि मॅसेडोनियाचा संगमरवरचा वापर केला जाईल. या मंदिरावर हिंदू महाकाव्यांचे फोटो आणि कथाही चित्रित केल्या जातील, ज्यामुळे त्याचे सौंदर्य अजून वाढेल. अहवालांनुसार, अबू धाबीमध्ये बांधले जाणारे हे मंदिर अयोध्येच्या राम मंदिरासारखे असेल. (हेही वाचा: Shri Amarnathji Shrine Board: एसएएसबीकडून नोंदणीकृत यात्रेकरांची नोंदणी शुल्क परत करण्याची घोषणा)

अबू धाबी येथे पहिल्या हिंदू मंदिराची पायाभरणी गेल्या वर्षी एप्रिलमध्ये करण्यात आली आणि डिसेंबरमध्ये कामाला सुरुवात झाली. भारत आणि संयुक्त अरब अमिरातीच्या नेतृत्वाखाली सोसायटीच्या सहकार्याने या ऐतिहासिक मंदिराचे काम प्रगतीपथावर आहे. भारतीय दूतावासाच्या आकडेवारीनुसार, यूएईमध्ये सुमारे 26 लाख भारतीय राहतात, जे तेथील लोकसंख्येच्या 30% आहे. यूएई सरकारने 2015 मध्ये जेव्हा पंतप्रधान मोदी दोन दिवसांच्या दौऱ्यावर तिथे गेले होते तेव्हा या मंदिराची घोषणा केली होती.