US: नोव्हेंबर पासून अमेरिकेच्या प्रवासासाठी राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांच्याकडून नवे नियम जाहीर
Representational image. (Photo Credits: Pexels)

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन (Joe Biden) यांनी कोरोनाच्या परिस्थितीमुळे विदेशी नागरिकांना देशात प्रवेशासाठी लावण्यात आलेल्या निर्बंधामध्ये सूट दिली जाणार आहे. तर नोव्हेंबर पासून पूर्णपणे लसीकरण झालेल्यांना अमेरिकेत प्रवेश करण्यास परवानगी असणार आहे. कोरोनाच्या प्रकरणी व्हाइट हाउसचे समन्वयक जेफ जेंट्स यांनी असे म्हटले की, विदेशी नागरिकांना विमानातून प्रवास करण्यापूर्वी पूर्णपणे लसीकरण होण्यासह आधीचे तीन निगेटिव्ह रिपोर्ट्स दाखवावे लागणार आहेत.

परदेशी नागरिकांसाठी अमेरिकेच्या प्रवासासंदर्भात सज्जनांनी सोमवारी नवीन गाइडलाइन्स जाहीर केल्या आहेत. बिडेन सरकारने लसीकरण न घेता परतणाऱ्या अमेरिकन नागरिकांच्या तपासणीचे नियम ही कडक केले आहेत. अशा लोकांना प्रवास सुरू करण्याच्या एक दिवस आधी आणि अमेरिकेत आल्याच्या एका दिवसात कोरोना चाचणी करावी लागेल.(PM Narendra Modi and Joe Biden Meet: राष्ट्रपती जो बिडेन 24 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी द्विपक्षीय बैठकीत सहभागी होतील)

ज्या लोकांचे पूर्णपणे लसीकरण झाले आहे त्यांना विलगीकरणात ठेवण्याची गरज नाही. कोरोना महामारीनंतर अमेरिकेने गेल्या वर्षीच्या सुरुवातीला परदेशी नागरिकांच्या येण्यावर बंदी घातली. याची सुरुवात चिनी नागरिकांपासून झाली. त्यानंतर भारत आणि ब्रिटनसह इतर अनेक देशांच्या नागरिकांनावर ही बंदी घातली गेली.

जेंट्सने असे म्हटले की, विमानातून प्रवास करणाऱ्या व्यक्तीचा फोन क्रमांक आणि अन्य माहितीसुद्धा घेतली जाणार आहे. नोव्हेंबर पूर्वी सीडीसी द्वारे याबद्दल निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे विमान आणि प्रवासासंबंधित अन्य एजेंसिकडून नव्या नियमानुसार प्रोटोकॉल लागू करण्यास वेळ मिळेल.