Gotabaya Rajapaksa : दस्तूर खुद्द देशाचे राष्ट्रपती गेले पळून, जाणून घ्या का आली राष्ट्रपतींवर पळून जाण्याची वेळ

श्रीलंकेतील (Sri Lanka) आर्थिक स्थितीला जबाबदार ठरवत विरोधी पक्षांनी आणि जनतेनं राष्ट्रपती गोतबाया राजपक्षे (Gotabaya Rajapaksa) यांच्या राजीनाम्याची (Resignation) मागणी केली होती. गेल्या दोन महिन्यापूर्वीच महिंदा राजपक्षे (Mahindra Rajapaksa) यांनी पंतप्रधानपदाचा (Prime Minister) राजीनामा दिला. श्रीलंकेच्या (Sri Lanka) संसदेत विरोधी पक्षांनी गोतबाया राजपक्षे यांच्या विरुद्ध देखील अविश्वास ठराव दाखल केला होता. मात्र संसदेनं हा ठराव फेटाळल्यानं त्यांना दिलासा मिळाला होता. दुसरीकडे विरोधी पक्षाकडून राष्ट्रपती गोतबाया राजपक्षे यांच्या विरोधात देशव्यापी आंदोलन करण्यात येत आहे. गोतबाया राजपक्षे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.

 

श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया यांच्या निवासस्थानाला आंदोलकांनी घेराव घातल्याने राजपक्षे पळून गेल्याची चर्चा आहे. आंदोलकांचा जमाव एवढा संतप्त होती की राष्ट्पती राजपक्षेवर स्वत:च्या घरुन पळून जाण्याची वेळ आली आहे. यापूर्वीही श्रीलंकेतील सरकारविरोधात झालेल्या आंदोलनात 78 नेत्यांच्या संपत्तीचं नुकसान झाल्याची माहिती देखील समोर आली होती. श्रीलंका १९४८ नंतर पहिल्यांदा मोठ्या आर्थिक संकटात सापडली आहे. श्रीलंकेच्या या आर्थिक संकंटाला राजपक्षे परिवार जबाबदार असल्याचा श्रीलंकेतील नागरिकांचा समज आहे. म्हणून संतप्त नागरिकांनी थेट राजपक्षेंच्या निवास स्थानावर हल्ला चढवला आहे. ( हे ही वाचा :- Joe Biden : गर्भपात अधिकाराचे संरक्षण करण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष जो बायडन यांची कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी)

 

भारताचा शेजारी देश श्रीलंका आज गरिबीच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. येथे महागाई गगनाला भिडली आहे. देशभरात वीजपुरवठा खंडित झाला आहे. विजेअभावी रुग्णांच्या आवश्यक शस्त्रक्रियाही रुग्णालयात होत नाहीत, कारखाने बंद, पेपर कमी असल्याने परीक्षा रद्द, रेल्वे-बसची वाहतूक ठप्प झाल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. तेलाचा अभाव.. पुरवठा साखळी पूर्णपणे कोलमडली आहे, घरातील चुल बंद झाल्या आहेत आणि खाण्यापिण्याच्या तुटवड्यामुळे दुकानांमध्ये लूट सुरू झाली आहे.