
सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (Serum Institute of India) आणि युनिसेफ (UNICEF) यांनी कोरोना लस कोविशिल्ट आणि नोव्हाव्हॅक्सच्या दीर्घकालीन पुरवठ्यासाठी करार केला आहे. या कराराअंतर्गत 100 देशांना 1.1 अब्ज लस डोस पाठविण्यात येणार आहेत. भारत जगातील सर्वात मोठ्या औषधी उत्पादक देशांपैकी एक आहे आणि कोरोना लस खरेदी करण्यासाठी बर्याच देशांनी भारताकडे संपर्क साधला आहे. ऑक्सफोर्ड-अॅस्ट्रॅजेनेकाची कोरोना व्हॅकसिन कोविशिल्ट पुण्यात सीरम इन्स्टिट्यूट तयार करत आहे. नोव्हाक्सची निर्मिती यूएस-आधारित नोव्हॅक्स इंक यांनी केली आहे. युनिसेफचे कार्यकारी संचालक हेनरीटा फोर यांनी सीरम संस्थेबरोबर कराराची घोषणा केली. (वाचा - COVID-19 Transmission: कोरोना विषाणूबाबत WHO ने दिला धोक्याचा इशारा; लसीकरणानंतरही व्हायरसचा प्रसार चालूच राहणार)
युनिसेफचे कार्यकारी संचालक हेनरीटा फोर म्हणाले की, आम्ही पॅन अमेरिकन हेल्थ ऑर्गनायझेशन (पीएएचओ) यासह अनेक संस्थांसह 100 देशांसाठी 1.1 अब्ज लस डोस पुरवण्यासाठी आर्डर दिली आहे. ही लस 3 अमेरिकन डॉलर किंमतीत कमी आणि मध्यम उत्पन्न असणार्या लोकांना दिली जाईल. (Coronavirus Vaccination Rumours: कोरोना व्हायरस लसीबाबत अफवा किंवा खोटी माहिती पसरवल्यास होणार कारवाई; केंद्राचे राज्यांना आदेश)
युनिसेफने म्हटले आहे की, आम्ही जागतिक आरोग्य संघटनेच्या लसीच्या मंजुरीच्या अधीन असलेल्या देशांमध्ये या लसींचे वितरण करण्यासाठी एसआयआय बरोबर काम करण्यास उत्सुक आहोत. कमी उत्पन्न गटाच्या लोकांना कोरोना लस देण्यासाठी COVAX ने पुढाकार घेतला आहे. याच नेतृत्व संयुक्त राष्ट्र संघ करत आहे.
कोवाक्स उपक्रमांतर्गत कोरोना लस 145 देशांतील मजूर आणि निम्न उत्पन्न गटातील लोकांना स्वस्त दराने दिली जाईल. यासाठी कोवाक्समध्ये सामील असलेल्या संघटनांनी कोरोना लस बनविणार्या अनेक कंपन्यांशी करार केला आहे.