Pakistan's First Moon Mission: पाकिस्तानने लॉंच केली आपली पहिली चंद्र मोहीम; चीनसोबत पाठवला उपग्रह, चंद्राच्या पृष्ठभागाचे घेणार फोटो
Pakistan's First Moon Mission (Photo Credit : Twitter)

Pakistan's First Moon Mission: भारताच्या चांद्रयान 3 ने 2023 साली चंद्रावर यशस्वी लँडिंग करून इतिहास रचला. चांद्रयानच्या यशस्वी लँडिंगमुळे, भारत चंद्राच्या पृष्ठभागावर पोहोचणारा जगातील चौथा आणि चंद्राच्या दूरच्या बाजूला पोहोचणारा पहिला देश बनला. भारताच्या यशानंतर शेजारी पाकिस्तानही (Pakistan) याबाबत बरोबरी साधण्याचा प्रयत्न करत आहे. यामुळे शुक्रवारी पाकिस्तानने चंद्रावर पहिली मोहीम पाठवली. चीनच्या चाँगई 6 रॉकेटच्या मदतीने पाकिस्तानची चंद्र मोहीम ICUBE-Qamar प्रक्षेपित करण्यात आली आहे.

पाकिस्तानी मीडिया रिपोर्ट्सनुसार, ICUBE-Qamar हा उपग्रह चीनच्या शांघाय युनिव्हर्सिटी आणि पाकिस्तानच्या नॅशनल स्पेस एजन्सीच्या सहकार्याने, पाकिस्तानच्या इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस टेक्नॉलॉजी (IST) ने डिझाइन आणि विकसित केला आहे. पाकिस्तानच्या स्थानिक वेळेनुसार दुपारी 2:58 वाजता या उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आले. चीनने प्रथमच चंद्राच्या दूरच्या बाजूने नमुने गोळा करून संशोधन करण्यासाठी 53 दिवसांची ही चंद्र मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेद्वारे पाकिस्ताननेही आपले हात धुवून घेतले.

पहा पोस्ट-

चांगई-6 ही चीनची सहावी चंद्र मोहीम आहे, जी चंद्रमाशी संबंधित नवीन रहस्ये उलगडण्याचा प्रयत्न करेल. चीनने 2030 पर्यंत चंद्रावर मानव पाठवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. हे मिशन देखील त्याच लक्ष्याचा एक भाग आहे. या मिशनद्वारे पाकिस्तानने ICUBE-Q ऑर्बिटरसह दोन ऑप्टिकल कॅमेरे पाठवले आहेत, जे चंद्राच्या पृष्ठभागाची छायाचित्रे घेतील. क्यूबसॅट्स हे एक प्रकारचे लघु उपग्रह आहेत. ते क्यूबच्या आकारात डिझाइन केलेले आहेत आणि त्यात मॉड्यूलर घटक आहेत. अशा उपग्रहांचे वजन अवघे काही किलोग्रॅम असून ते विविध कामांसाठी अवकाशात तैनात करण्यात आले आहेत. पाकिस्तानने पहिल्यांदाच आपला असा उपग्रह चंद्रावर पाठवला आहे. (हेही वाचा: Tech Sector Layoffs: टेक कंपन्यांनी 4 महिन्यांत 80,000 हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले; गेल्या 2 वर्षात 4.25 लाख लोकांनी गमावल्या नोकऱ्या)

चीनचा चाँगई 6 चंद्रावर उतरणार आहे, मात्र त्याच्यासोबत असलेला पाकिस्तानचा क्यूबसॅट उपग्रह तेथे पोहोचणार नाही. चीनचे चांद्रयान पाकिस्तानी iCube-Q ला चंद्राच्या कक्षेत सोडेल आणि नंतर त्याचा पुढील प्रवास पूर्ण करेल. हे चिनी मिशन चंद्राच्या अंधाऱ्या भागात उतरेल आणि तेथून नमुने पृथ्वीवर संशोधनासाठी घेऊन जाईल. 2000 ग्रॅम नमुना आणणे अपेक्षित आहे.