
कोरोना विषाणूने संपूर्ण जगभरात हाहाकार माजवला होता. कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, अनेकजण कोरोना विषाणूच्या जाळ्यात अडकले आहेत. 170 हून अधिक देश कोरोना विषाणूचा सामना करत आहेत. तसेच कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी अनेक प्रयत्नही केले जात आहेत. यातच कोरोनावर लस शोधल्याचा दावा ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटीचे (University Of Oxford) प्राध्यापक सारा गिल्बर्ट (Prof. Sarah Gilbert) यांनी केला आहे दावा केला आहे. या औषधाचे 12 वेळा परीक्षण करण्यात आले आहे. औषधाचा रोग प्रतिकारक शक्तीवर चांगला परिणाम दिसून आला आहे. याची वैद्यकीय चाचणी देखील सुरु झाली आहे, अशी माहिती गिल्बर्ट यांनी दिली आहे. तसेच तसेच येत्या सप्टेंबर महिन्यात लस उपलब्ध होऊ शकते, अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली आहे.
जगभरात कोरोना विषाणुचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. हा आकडा आता 22 लाखाहून अधिक झाला आहे. यात जवळपास 1 लाख 54 हजार लोकांना आपला प्राणही गमवावा लागला आहे. कोरोना विषाणूने सध्या जगभरात धुमाकूळ घातला आहे. यातच दिलासा देणारी माहिती समोर आली आहे. ब्रिटनमधील ऑक्सफोर्ड विद्यापीठातील प्राध्यापकांनी कोरोना लस बनवल्याचा दावा केला आहे. दरम्यान, गिल्बर्ट म्हणाले की, “आमची टीम अशा आजारावर संशोधन करत होती जो आजार महामारीचे रुप धारण करु शकतो. या कोरोना लसला एक्स (X) असे नाव देण्यात आले आहे. या औषधाचे 12 वेळा परीक्षण करण्यात आले आहे. औषधाचा रोग प्रतिकारक शक्तीवर चांगला परिणाम दिसून आला आहे. याची वैद्यकीय चाचणी देखील सुरु झाली आहे.” अशी माहिती ब्लूमबर्गने त्यांच्या वृत्तांत दिली आहे.
चीनच्या वुहान प्रांतातून जगभर पसरलेल्या कोरोनाने आतापर्यंत जवळपास 1 लाख 15 हजारांहून अधिक लोकांचा बळी घेतला आहे. तर, 20 लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे कोरोना विषाणूवर लस शोधण्यासाठी जगभर संशोधन सुरू आहेत. लस शोधण्यासाठी कोणताही विषाणू मानवी शरीराबाहेर असणे आवश्यक आहे. कारण, त्यामुळे विषाणूंवर वेगवेगळे प्रयोग करणे सोपे नसते. काही देशांना यात यश आले आहे. भारत हा जगातील पाचव्य़ा क्रमांकाचा देश आहे, जिथे हा विषाणू मानवाच्या शरीराबाहेर ठेवण्यात यश आले असून त्यावर लस शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे, अशी माहिती पद्मश्री डॉ. रमण गंगाखेडकर यांनी काही दिवसांपूर्वी एका वृत्तवाहिनीला दिली होती.