अमेरिका आणि ईरान यांच्यातील ताणलेल्या संबंधांच्या पार्श्वभूमीवर इंग्लंड आणि ईरान यांच्यातील संबंधातही दुरावा येऊ लागला आहे. खाडी क्षेत्रात ईरानने (Iran) इंग्लंडची (England तेलवाहू दोन जहाजं पकडली आहेत. या दोन जहाजांपैकी एक इंग्लंड (England) तर दुसरे लायबेरियाचे असल्याचे समजते. प्राप्त माहितीनुसार इंग्लंडच्या तेलवाहू जहाजारवर एकूण 23 क्रू मेंबर्स आहेत. त्यापैकी 18 क्रू मेंबर्स हे भारतीय (Indian) नागरिक आहेत. त्यामुळे या प्रकरणावर भारताचेही बारीक लक्ष आहे.
ईरानच्या ताब्यात असलेल्या तेलवाहू जहाजाचे नाव स्टेना इम्परो असे आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या दिल्ली येथील कार्यालयाने म्हटले आहे की, आम्ही इरानच्या संपर्कात असून लवकरच भारतीय नागरिकांची सुटका होईल असे प्रयत्न केले जात आहेत. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रविश कुमार यांनी म्हटले की, आमचे मिशन ईरान सरकारच्या संपर्तकात सातत्याने आहे. जेनेकरुन हे नागरिक मायभूमित परततील.
प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, मच्छीमरांच्या नौकेला ब्रिटश तेलवाहू जहाजाने कथीत धडक दिली. त्यानंतर ईरानने इंग्लंडचे हे जहाज आपल्या ताब्यात घेतले. हॉर्मूज जलडमरूमध्य येथील या घटनेबाबत इंग्लंडमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. इंग्लंडचे परराष्ट्र मंत्री जेरेमी हंट यांनी ईरानची ही घटना म्हणजे गैरव्यवहार असल्याचे म्हटले आहे. तसेच या घटनेबाबत चिंता व्यक्त केली आहे. या प्रकरणावर तोडगा काढण्यासाठी जेरेमी हंट यांनी एक बैठक बोलावली आहे. (हेही वाचा, ईरान-इंग्लंड तणाव वाढला, तेल टँकर ताब्यात घेण्यावरुन उभय देशांमधील संघर्ष टीपेला)
ईरानने ताब्यात घेतलेल्या स्टेना इम्परो जहाजावर भारतीयांसह काही रशियन आणि इतर देशांच्या क्रू सदस्यांचाही समावेश आहे. जहाज मालक आणि शिपिंग कंपनी स्टीना बल्क यांनी एका प्रतिक्रेयत म्हटले आहे की, तेलवाहू जहाज होर्मुज खाडी (Strait of Hormuz) पार करत असताना एका अज्ञात छोटी नाव आणि एका हेलिकॉप्टर द्वारे या जहाजाशी संपर्क करण्यात आला. हे जहाज आंतरराष्ट्रीय सीमेत असताना स्टेना इम्परो जहाजासोबत हा प्रकार घडला. दरम्यान, जहाज कंपनीच्या आणि मालकाच्या या प्रतिक्रियेवर प्रतिक्रिया देताना ईरानने म्हटले आहे की, आम्ही आंतरराष्ट्रीय सीमांचे आणि कायद्याचे पालन करुनच हे जहाज ताब्यात घेतले आहे. तसेच, हे जहाज ताब्यात घेतानना कोणालाही कोणत्याही प्रकारची हानी पोहोचवली नाही.