Shri Thanedar | (Photo Credit- X)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) अमेरिका दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते यूएस राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ड्रम्प (US President Donald Trump) यांची भेट घेतील. भारत आणि अमेरिकाच नव्हे तर आंतराष्ट्रीय पातळवरही या भेटीकडे मोठ्या उत्सुकतेने पाहिले जात आहे. खास करुन उभ देशांमधील द्विपक्षीय संबंधांवर या भेटीचा मोठा परिणाम होईल, असे सांगितले जात आहे. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर भारतीय-अमेरिकन काँग्रेस नेते आणि खासदार श्री ठाणेदार (Shri Thanedar) यांनी महत्त्वाच्या विविध मुद्द्यांवर भाष्य केले आहे. ज्यामध्ये अमेरिकेचे आयात शुल्क धोरण, देशोदेशीच्या नागरिकांचे स्थलांतर त्यातून उद्भवणाऱ्या समस्या, द्विपक्षीय संबंध, वाणिज्य आणि बांगलादेश अशा विविध मुद्द्यांचा समावेश आहे.

काळ मोठा कठीण

श्री ठाणेदार पुढे बोलताना म्हणाले, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मी या आधी दोन वेळा भेटलो आहे. अवघ्या जगासाठी सध्याचा काळ मोठा कठीण आणि रोमांचक आहे. अशा काळात हे दोन्ही नेते भेटत आहेत. मला वाटते ही भेट महत्त्वाची आहे. मी ही भेट आणि त्यांच्यातील बैठकीसाठी उत्सुक आहे. दोन्ही नेत्यांमध्ये अनेक मुद्द्यांवर चर्चा होणे गरजेचे आहे. ज्यामध्ये आयातशुल्क हा एक मोठाच मुद्दा आहे. याशिवाय द्विपक्षीय संबंध, वाणिज्य, इमिग्रेशन समस्या, अशा अनेक गोष्टी सुरु आहेत. मला आशा आहे की बरेच काही करता येईल. विविध विषयांवर चर्चा होईल.

(हेही वाचा, Global Trade Trade War: अमेरिकेकडून स्टील आणि ॲल्युमिनियमवरील शुल्क दरात वाढ; डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणामुळे जागतिक व्यापार व्यापार युद्ध?)

अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर बैठक

बांगलादेशच्या मुद्द्यावर चर्चा होण्याची शक्यता

नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीत बांगलादेशच्या मुद्द्यावर चर्चा होईल का, असे विचारले असता श्री ठाणेदार म्हणाले, मला आशा आहे की ते या मुद्द्यावर चर्चा करतील. एक काँग्रेस सदस्य म्हणून मी मुद्द्यावर या आधीही बरेच काही बोललो आहे. मी नेहमीच राष्ट्रप्रमुख आणि नेत्यांना बांगलादेशच्या मुद्द्यावर विचार करण्याची विनंती केली आहे. जो बायडेन राष्ट्राध्यक्ष असताना त्यांच्या नेतृत्वाखालील परराष्ट्र खात्याने बांगलादेशविरुद्ध बरेच निर्बंध जारी केले होते.

(हेही वाचा, Shri Thanedar Supports Kamala Harris: श्री ठाणेदार यांचा कमला हॅरीस यांना पाठिंबा; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपद निवडणुकीतून Joe Biden बाहेर)

द्विपक्षीय चर्चेस महत्त्व

मोदी-ट्रम्प बैठकीत मांडले जाणारे प्रमुख मुद्दे

श्री ठाणेदार मंगळवारी (स्थानिक वेळेनुसार) माध्यमांशी बोलताना म्हणाले, हा एक रोमांचक काळ आहे. पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यापूर्वी दोनदा भेटले आहेत. शुल्क, वाणिज्य आणि इमिग्रेशनसह अनेक महत्त्वाचे मुद्दे आहेत ज्यांवर लक्ष देणे आवश्यक आहे. मला आशा आहे की या संवादातून बरेच काही साध्य करता येईल. दरम्यान, ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशन अमेरिकेचे कार्यकारी संचालक ध्रुव जयशंकर यांनी सुचवले की दोन्ही देश एकमेकांशी व्यापार वाद टाळण्यासाठी करार करू शकतात.

(हेही वाचा, PM Modi on Startup Ecosystem: स्टार्टअप इंडियाने भारताला सर्वात जीवंत स्टार्टअप इकोसिस्टमपैकी एक बनले: Prime Minister Narendra Modi)

व्यापार युद्ध ठाळण्यास प्राधान्य?

भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी वृत्तसंस्था एएनआयशी बोलताना सांगितले की, उभय देश व्यापार युद्ध टाळण्यासाठी चर्चा करणयाची शक्यता आहे. येत्या काही वर्षांत दोन्ही बाजू विशिष्ट शुल्कांवर आणि व्यापार वाद टाळण्यासाठी एक चौकटीवर तोडगा काढतील असा करार होऊ शकतो. भारत हा जागतिक स्तरावर एक प्रमुख स्टील उत्पादक देश आहे आणि कोणत्याही वाढीचे महत्त्वपूर्ण परिणाम होऊ शकतात.

अमेरिकेतील बेकायदेशीर भारतीय स्थलांतरितांच्या विषयावर जयशंकर म्हणाले की, भारताने हद्दपारी धोरणांबाबत विविध राष्ट्रांशी दीर्घकाळ सहकार्य केले आहे. भारत नेहमीच असे म्हणत आला आहे की जर अशा व्यक्तींना भारतीय नागरिक म्हणून ओळखले गेले ज्यांनी त्यांच्या व्हिसाची मुदत संपली आहे किंवा कागदपत्रे नाहीत तर त्यांना परत घेतले जाईल. हे नवीन धोरण नाही, परंतु त्यांच्या दृष्टिकोनामुळे भारतात चिंता निर्माण झाली आहे. हद्दपारी प्रक्रिया व्यवस्थापित करण्याबाबत रचनात्मक चर्चा आवश्यक आहे, असेही ते पुढे म्हणाले.

दरम्यान, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी 12-13 फेब्रुवारी रोजी अमेरिकेला भेट देणार आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा पदभार स्वीकारल्यानंतर मोदी आणि ट्रम्प यांच्यातील ही पहिलीच अधिकृत बैठक असेल.