Prime Minister Narendra Modi on Startup Ecosystem: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'स्टार्टअप इंडिया' उपक्रमाच्या नवव्या वर्धापनदिनानिमित्त कौतुक करताना म्हटले आहे की, स्टार्टअप इंडिया उपक्रमामुळे भारत जागतिक स्तरावर सर्वात मोठा आणि सर्वात जीवंत स्टार्ट-अप इकोसिस्टम बनला आहे. युवा सक्षमीकरणाला चालना देणारे हे एक सशक्त माध्यम म्हणून उदयास आल्याने हा उपक्रम आपल्या हृदयाच्या अगदी जवळ असल्याचे सांगून ते म्हणाले की, नावीन्य, उद्योजकता आणि विकासाची नव्याने व्याख्या करणारा हा एक ऐतिहासिक उपक्रम आहे. गेल्या नऊ वर्षांत या परिवर्तनकारी कार्यक्रमाने असंख्य तरुणांना सक्षम केले आहे आणि त्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पनांचे यशस्वी स्टार्टअपमध्ये रूपांतर केले आहे, असे त्यांनी 'एक्स'वरील पोस्टमध्ये म्हटले आहे.
दशकभरापूर्वी या प्रणालीतील भारताच्या क्षमतेवर शंका घेण्यात आली होती, असे सांगून पंतप्रधान म्हणाले की, या परिवर्तनकारी कार्यक्रमाने असंख्य तरुणांना सक्षम केले आहे आणि त्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पनांचे यशस्वी स्टार्टअपमध्ये रूपांतर केले आहे. फिनटेकपासून एडटेकपर्यंत, स्वच्छ ऊर्जेपासून शाश्वत तंत्रज्ञानापर्यंत भारतीय स्टार्टअप्स जागतिक आव्हाने सोडवत आहेत, त्याचबरोबर रोजगाराच्या संधी निर्माण करत आहेत आणि आत्मनिर्भरतेच्या दिशेने देशाच्या प्रयत्नांना बळ देत आहेत. प्रत्येक स्वप्न साकार करण्यासाठी आणि 'आत्मनिर्भर भारतात' योगदान देणाऱ्या उद्योजकीय परिसंस्थेला चालना देण्यासाठी आपल्या सरकारची वचनबद्धता अधोरेखित करताना ते म्हणाले की, स्टार्टअपच्या संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्या सरकारने कोणतीही कसर सोडली नाही.
आपल्या सरकारची धोरणे 'व्यवसाय सुलभता', संसाधनांची अधिकाधिक उपलब्धता आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक संधीवर त्यांना पाठिंबा देण्यावर केंद्रित असल्याचे ते म्हणाले. "आम्ही इनोव्हेशन आणि इन्क्युबेशन सेंटरला सक्रियपणे प्रोत्साहन देत आहोत जेणेकरून आमचे तरुण जोखीम घेणारे बनू शकतील. मी वैयक्तिकरित्या येणाऱ्या स्टार्टअपशी नियमितपणे संवाद साधतो. स्टार्टअप इंडियाचे हे यश दर्शवते की आजचा भारत गतिशील, आत्मविश्वासी आणि भविष्यासाठी तयार आहे. तुम्ही निराश होणार नाही, अशी माझी खात्री आहे, असे ते म्हणाले.