Hari Shukla,  87  वर्षीय भारतीय वंशाच्या व्यक्तीचा युकेच्या Newcastle Hospital मध्ये  प्रथम Pfizer-BioNTech ची कोविड 19 लस मिळणार्‍यांच्या यादीत समावेश
COVID-19 Vaccine in UK| Photo Credits: PTI and Twitter/ itvnews

युके मध्ये अमेरिकेच्या Pfizer-BioNTech च्या कोविड 19 लसीच्या तातडीच्या वापराला मान्यता मिळाल्यानंतर आता तेथे वृद्धाश्रमात राहणार्‍यांना लस देण्यास सुरूवात झाली आहे. सुरूवातीच्या काही लोकांमध्ये तेथे भारतीय वंशाच्या हरी शुक्ला (Hari Shukla) या 87 व्यक्तीचा समावेश आहे. Tyne and Wear मधील हरी शुक्ला यांना युकेमध्ये Newcastle Hospital मध्ये ही लस देण्यात आली आहे. Pfizer-BioNTech COVID-19 Vaccine: जाणून घ्या जगातील सर्वप्रथम मान्यता मिळालेल्या लसीबद्दल खास गोष्टी!

हरी शुकला यांनी लसीकरणावर आपली प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, ' जेव्हा मला कोविड 19 विरूद्ध लसीकरणासाठी कॉल आला तेव्हा मी उत्साहित होतो. आता कोरोना वायरस जागतिक आरोग्य संकटाच्या शेवटाकडे आपली वाटचाल सुरू झाली असं चित्र आहे. त्यामुळे या अभियानात सहभागी होणं हे मी माझं कर्तव्य समजतो. हे साधंसुधं आरोग्य संकट नव्हतं. त्यामुळे लसीकरणातून अनेकांना मदत होणार असेल तर ती करायला हरकत नाही. मी लस घेण्याबाबत मूळीच नर्व्हस नाही.'

सध्या युके मध्ये Pfizer-BioNTech ला पहिली मंजुरी मिळाल्यानंतर त्यांनी देशाभरातील केअर होम मध्ये राहणार्‍या 80 वर्षांपेक्षा अधिकच्या नागरिकांची निवड केली आहे. त्यानंतर आरोग्य कर्मचार्‍यांना लस दिली जाणार आहे. याकरिता हॉस्पिटल्स सुसज्ज ठेवण्यात आली आहे. पहिल्याच आठवड्यात अंदाजे 800,000 लसीचे डोस युके मध्ये दिले जाणार आहेत.

ट्वीट

युकेचे पंतप्रधान Boris Johnson यांनी देखील या लसीकरणाच्या मोहिमेच्या सुरूवातीला आनंद व्यक्त केला आहे. युकेच्या कोविड 19 विरूद्धच्या लसीकरणाच्या मोहिमेमध्ये हे मोठं पाऊल आहे. मला वैज्ञानिकांचा, रूग्णांची सेवा करणार्‍या आरोग्य कर्मचार्‍यांचा, त्यांच्या अथक परिश्रमांचा अभिमान आहे. असे म्हणत मानवी चाचण्यांमध्ये सहभाग घेतलेल्यांचे देखील आभार मानले आहे. सध्या युके हा कोविड 19 लसीकरणाला सुरूवात करणारा पहिला देश ठरला आहे.