Pfizer-BioNTech COVID-19 Vaccine: जाणून घ्या जगातील सर्वप्रथम मान्यता मिळालेल्या लसीबद्दल खास गोष्टी!
Pfizer-BioNTech COVID-19 Vaccine | Representational Image (Photo Credits: IANS)

अमेरिकेतील सर्वात मोठी फार्मासिटीकल कंपनी फायझर (Pfizer) आणि जर्मनीची बायोटेक कंपनी (German Biotech Company) BioNTech  यांनी एकत्रितपणे कोविड-19 (Covid-19) वरील लस विकसित केली आहे. 'BNT162b2' असे या लसीचे नाव आहे. युके च्या हेल्थ रेग्युलेटरने (Heath Regulator) या लसीसाठी परवानगी दिली असून या लसीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन आणि वापर पुढील आठवड्यापासून सुरु होईल, अशी माहिती युके सरकारकडून (UK Government) देण्यात आली आहे. या लसीच्या क्लिनिकल ट्रायल्समधून आलेल्या अहवलानुसार, ही लस कोविड-19 विरुद्ध 95 टक्के परिणामकारक असल्याचे सिद्ध झाले आहे. या लसीचे परिणाम लहान मुलं आणि प्रौढांवर सारखेच दिसून आले आहेत.

तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायल्सच्या निकालांनुसार, ही लस 18 वर्षावरील अनेक व्यक्तींना चाचणी म्हणून देण्यात आली होती. यात सहभाग घेतलेल्या 170 पैकी 162 जणांना placebo देण्यात आलं. तर केवळ 8 जणांना लस देण्यात आली. ही लस सर्व वयोगटातील व्यक्तींमध्ये आणि महिला-पुरुषांमध्ये सारखीच प्रभावी आहे. (Britain ठरला Pfizer-BioNTech COVID-19 Vaccine च्या वापराला मंजुरी देणारा जगातील पहिला देश; पुढील आठवड्यापासून लसीकरण शक्य)

Pfizer-BioNTech Covid-19 Vaccine कसं काम करते?

Pfizer-BioNTech ने विकसित केलेली COVId-19 वरील लस mRNA- a या मॉलिक्युलवर आधारित आहे. आपल्या शरीरातील पेशींनी कसे कार्य करावे यासाठी हा मॉलिक्युल काम करतो. त्याचप्रमाणे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी देखील हा मॉलिक्युल उपयुक्त ठरतो. ही लस दिल्यानंतर mRNA- a मॉलिक्युल व्यक्तीच्या शरीरातील पेशींना स्पाईक प्रोटीनच्या कॉपी बनवण्याचे आदेश देतो. यामुळे रोगप्रतिकारक पेशी अँटीबॉडीज तयार करतात आणि कोरोना संसर्गाविरुद्ध लढण्यास मदत करतात.

तज्ज्ञांनुसार, mRNA वर आधारीत असलेल्या लसीचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन अगदी सहजरित्या करता येऊ शकते. यासाठी प्रयोगशाळेतील bioreactors चा वापर करता येईल. 2020 पर्यंत 5 कोटी लसीचे डोस उपलब्ध करुन देऊ शकतील. तर 2021 पर्यंत जगभरामध्ये 1.3 बिलियन डोसेस उपलब्ध करुन देऊ, अशी माहिती Pfizer आणि BioNTech ने दिली आहे.

ही लस अत्यंत कमी तापमानात ठेवावी लागत असल्याने या लसीच्या साठवणीचा मोठा प्रश्न आहे. लस कॅरी करण्यासाठी कंपनीने एका वेगळ्या प्रकारचे केस (carrying case) बनवले आहेत. -70 डिग्री पर्यंत जाणारे मेडिकल फ्रिझर्स अमेरिकेत आणि युरोपमध्ये आढळणे दुर्मिळ आहे. तसंच ज्या देशांमध्ये या लसीच्या स्टोरेजची सुविधा उपलब्ध नाही अशा देशांसाठी ही लस स्वीकारणे खूप कठीण जाणार आहे.