Photo Credit- X

Woman Cleaning Husband Bed: पतीचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या पत्नीला रक्ताचे डाग पडलेला तो पलंग गरोदर पत्नीला स्वच्छ करायला लावल्याची ही घटना मध्य प्रदेशातल्या दिंडोरी या ठिकाणी घडली आहे. डॉ. रमेश मारावी यांनी छोटीबाई ठाकूर (आया) आणि राजकुमारी मर्कर या दोन कर्मचाऱ्यांनी महिलेसोबत हा घृनास्पद प्रकार केला. त्या दोघांचं निलंबण करण्यात आलं आहे. या महिलेने अशा वागणूकीला आधी विरोध केला होता. (हेही वाचा: Batteries, Razor Blade Fragments, Screws: 14 पेन्सिल, बॅटरी, पिन, ब्लेड...; पोटातून काढल्या 65 वस्तू, शस्त्रक्रियेच्या काही तासात 14 वर्षांच्या मुलाचा मृत्यू)

नकार दिल्यानंतर तिला त्रास दिला गेला. त्यानंतर जबरदस्तीने या महिलेला हे काम करायला भाग पाडलं. ही घटना समोर येताच नागरिकांमध्ये मोठी संतापाची भावना निर्माण झाली आहे.या प्रकरणाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रुग्णालयातल्या दोन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार जमिनीच्या वादातून धरमसिंग मारवी आणि त्यांची तीन मुलं शिवराज, रघुराज आणि रामराज या तिघांवर हल्ला करण्यात आला. या घटनेत शिवराज हा त्यांचा मुलगा गंभीर जखमी झाला होता. त्याचा मृत्यू जागेवरच झाला. मात्र तो गंभीर जखमी झाला असावा म्हणून त्याच्यासह तिघांनाही रुग्णालयात आणण्यात आलं.

डॉक्टरांनी शिवराजला मृत घोषित केलं. यानंतर शिवराजचा मृतदेह रुग्णालयातील पलंगावरुन काढल्यानंतर तो पलंग त्याच्या गरोदर पत्नीला रुग्णालयातील दोन कर्मचाऱ्यांनी स्वच्छ करायला लावला असा आरोप झाला आहे. या प्रकरणाचा व्हिडीओ व्हायरलही झाला आहे. आम्ही या प्रकरणी दोन कर्मचाऱ्यांचं निलंबन केलं आहे असं आरोग्य अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे.

नेमकी घटना काय?

गरोदर महिलेच्या पतीचा मृत्यू झाला. त्याच्यावर गदासराई या ठिकाणी असलेल्या रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यानंतर एक व्हिडीओ व्हायरल झाला होता ज्यात ही गरोदर महिला रक्ताचे डाग असलेला पलंग स्वच्छ करताना दिसते आहे. प्रायमरी हेल्थ सेंटर गदासराई या ठिकाणी ही धक्कादायक घटना घडली आहे. यानंतर लोकांनी या व्हिडीओवर संतप्त प्रतिक्रिया दिल्या. एका गरोदर महिलेला हे करावं लागतं आहे म्हणून नेटकरी संतापले होते. हा प्रकार दुर्दैवी असल्याच्या प्रतिक्रिया आल्या. ज्यानंतर दोन महिला कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं आहे.