Kurla Bus Accident: कुर्ला येथे सोमवारी रात्री बेस्ट बसचा भीषण अपघात झाला. रात्री नऊच्या सुमारास हा अपघात (Mumbai Kurla Bus Accident) झाला. या अपघाताने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. कुर्ला एलबीएस मार्गावरून भरधाव वेगानं जाणाऱ्या बसवरचं चालकाचं नियंत्रण सुटलं आणि या भीषण अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला. तर 49 जण गंभीर जखमी झाले. त्याशिवाय रस्त्यावरच्या 20-22 वाहनांचाही नुकसान झालं. तयातच आचा मोठी माहिती उघड झाली आहे. संजय मोरेचं इलेक्ट्रिक बस चालवण्याचं प्रशिक्षणच नीट न झाल्यानं अपघात झाल्याचं समोर आलं आहे. (Kurla BEST Bus Accident: कुर्ला दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा)
कुर्ला बेस्ट बस अपघातानंतर आता आरोप प्रत्यारोपांचं सत्र सुरु झालं आहे. अपघात नेमका कसा घडला? अपघातात दोषी कोण? या प्रश्नांची उत्तरे सगळे शोधतायत. बस चालक संजय मोरे वर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली आहे. पोसिलांना तपासादरम्यान महत्त्वाची माहिती मिळाली आहे. त्यामुळे प्रकरण आणखी खोलवर जाण्याची शक्यता आहे. चालक संजय मोरेचं इलेक्ट्रिक वाहन चालवण्याचं प्रशिक्षणचं नीट झालं नव्हत अशी माहिती समोर आली आहे. आणि त्यामुळे हा अपघात झाला.(Mumbai Kurla Bus Accident: नोकरीचा पहिलाच दिवस ठरला आयुष्याची अखेर; कुर्ला बस अपघातात 19 वर्षीय आफरीन शाह हिचा मृत्यू)
संजय मोरे याला केवळ तीन दिवसांचं इलेक्ट्रिक वाहन चालवण्याचं प्रशिक्षण देण्यात आलं होतं, अशीही माहिती समोर आली आहे. याआधी संजय मोरे जूनी बस चालवायचे. अपघातावेळी संजय मोरे याने क्लच समजून अॅक्सिलरेटरवर पाय दिल्यामुळे बस थांबण्याऐवजी तिचा वेग वाढला, अशी धक्कादायक माहिती देखील तपासात उघड झाली आहे.
दरम्यान, संजय मोरे पोलिसांनी संजय मोरे यांच्या पत्नीलादेखील काही प्रश्न विचारले. 'कामावर हजरे होण्यापूर्वी त्यांची मानसिक स्थिती योग्य होती का?, घरातून निघताना भांडण झालं होतं का?', असे प्रश्न संजय मोरे यांच्या पत्नीला विचारण्यात आले. त्यावर सकाळी दोघांमध्ये काहीही झाले नव्हते. 'ते नेहमी वेळेवर जातात. ते कधीच दारु पीत नाहीत, कधीही ते मान वर करुनही बोलले नाही. अआजपर्यंत त्यांच्या हातून अपघात झाला नव्हता. ते निर्दोष आहेत, असे त्यांच्या पत्नीने पोलिसांना सांगितले. त्याशिवाय, बेस्ट गाड्या व्यवस्थित नाहीत. बसचा काहीतरी दोष असावा', असं संजय मोरे यांच्या पत्नीने सांगितले.