Mumbai Bus Accident: मुंबईतील कुर्ला (Kurla Tragedy) येथे एस जी बर्वे मार्गावर (SG Barve Marg Crash) झालेल्या भीषण बेस्ट बस अपघातात (BEST Bus Accident) सहा जणांचा मृत्यू झाला तर 43 जण जखमी झाले. अपघातामधील मृतांमध्ये आफरीन शाह (Afrin Shah Death) हिचा सामावेश आहे. ही केवळ 19 वर्षांची मुलगी आयुष्यात पहिल्यांदाच नोकरीला लागली होती. धक्कादायक म्हणजे नोकरीचा तिचा पहिलाच दिवस होता. हा दिवस तिचा आयुष्यातील अखेरचा असेल असा तिने स्वप्नातही विचार केला नसेल. नोकरीचा पहिला दिवस पूर्ण करुन घरी परतत असताना तिच्यावर काळाने घाला घातला. मुंबई बस अपघातात तिचा मृत्यू झाला. काय घडले नेमके?
वडिलांचे मार्गदर्शन आणि आफरीन हिचा मृत्यू
कुर्ला बस अपघात दुर्घटनेत बळी ठरलेली, आफरीन नोकरीचा पहिलाच दिवस असल्याने काहीशी गोंधळलेली होती. ती कुर्ला स्टेशनला आली खरी मात्र घरी परतण्यासाठी बराच वेळ वाट पाहूनही तिला वाहन सापडले नाही. त्यामुळे तिने वडिल अब्दुल सलीम यांच्याशी संपर्क केला. वडिलांनी फोनवरील संवादात तिला कुर्ला स्थानकावर पायी जाण्याचा सल्ला दिला. तसेच, तिथे तुला बस मिळेल, असेही सांगितले. दरम्यान, पुढच्या काहीच मिनीटांमध्ये वडिलांना एक फोन आला. ज्यामध्ये त्यांना तातडीने रुग्णालयात पोहोचण्यास सांगण्यात आले. सलीम तिथे पोहोचले तेव्हा त्यांना आपल्या मुलीचा मृतदेह आढळला. आपल्या मुलीचे निर्जीव पार्थीव पाहून वडिलांच्या आश्रुंचा बांध फुटला.
वडीलांच्या दु:खाला पारावार नाही
#WATCH | Maharashtra | Father of one of the deceased in the Kurla bus accident says, "My daughter was returning from her job when this incident took place and she lost her life...The bus depot made at the Kurla station...I request the CM to look into this matter and take action… pic.twitter.com/SxocNpY8RR— ANI (@ANI) December 10, 2024
एसजी बर्वे मार्गावरील दुर्दैवी संध्याकाळ
नेहमी रहदारी आणि वर्दळीचा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुर्ला येथील एस. जी. बर्वे मार्गावरी रविवारची सायंकाळ अत्यंत दुर्दैवी ठरली. या मार्गाव बेस्ट (बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि वाहतूक) बसचे नियंत्रण सुटल्याने मोठा अपघात झाला. ही बस पूर्णत: इलेक्ट्रानीक होती आणि तिने बसस्थानकात प्रवेश करण्यापूर्वीच पादचाऱ्यांना आणि वाहनांना धडक दिली.
परिचारिका कनीस अन्सारी हिच्यासह इतरांचाही मृत्यू
बेस्ट बस अपघात घटनेत मृत्यमुखी पडलेल्या मृतांमध्ये 55 वर्षीय परिचारिका कनीस अन्सारी या देखील होत्या. ज्या त्यांच्या रात्रीच्या शिफ्टसाठी रुग्णालयात निघाल्या होत्या. इतर पीडितांमध्ये अनम शेख, शिवम कश्यप, विजय गायकवाड आणि फारुख चौधरी यांचा समावेश आहे. (हेही वाचा, Kurla BEST Bus Accident: कुर्ला दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा)
आई थांबली..उशीरा निघाली.. परत आलीच नाही
तपास आणि वाहनचालकाला अटक
माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी हजेरी लावली. पोलिसांनी बस चालक संजय मोरे याला ताब्यात तातडीने ताब्यात घेतले. बेस्ट अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, प्राथमिक निष्कर्ष असे सूचित करतात की चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले होते. ब्रेक निकामी होण्यासारख्या यांत्रिक बिघाडाचा समावेश होता की नाही हे निर्धारित करण्यासाठी अधिकारी तज्ज्ञ अहवालाच्या प्रतीक्षेत आहेत. दरम्यान, प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, बसमध्ये कोणताही तांत्रिक बिघाड नव्हता, तसेच ब्रेक फेल झाला तर ही बस पुढे जात नाही, अशी माहिती बस निर्माता कंपनीच्या तज्ज्ञांनी दिली आहे. (हेही वाचा:Kurla Best Bus Accident: कुर्ला बेस्ट बस अपघातात मृतांचा आकडा 6 वर; 43 जखमी, बस चालकावर गुन्हा दाखल)
मुख्यमंत्र्यांकडून नुकसान भरपाईची घोषणा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृतांच्या कुटुंबीयांना शासकीय तिजोरीतून प्रत्येकी 5 लाखांची मदत जाहीर केली आहे. जखमींचा वैद्यकीय खर्च राज्य सरकार उचलेल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
दरम्यान, कुर्ला येथील बस अपघातामुळे मुंबईतील पादचारी मार्गावरुन जाणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी चालकाला अटक आली असली तरी, त्यामुळे प्रकरणातील गुंतागुंत अद्यापही सुटली नाही. मुळात चालकाच्या अनुभाववरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्याला अवजड वाहने चालविण्याचा अनुभव नव्हता. तसेच, इलेक्ट्रीक बस तर त्याने यापूर्वी केव्हाच चालवली नव्हती.