Photo Credit- X

Kurla Best Bus Accident: कुर्ल्यामध्ये सोमवारी रात्री बेस्ट बसचा भीषण अपघात झाला. बसने समोर येणाऱ्या अनेकांना (Kurla Bus Accident) चिरडले. यात अनेक दुचाकी, रिक्षांचे नुकसान झाले. या भीषण अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला. तर 43 जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. अचानक झालेल्या या जीवघेण्या अपघाताने कुर्ला पश्चिम येथील आंबेडकर नगरच्या रस्त्यावर स्मशान शांतता पसरली होती.(Kurla Best Bus Accident: कुर्ल्यात मृत्यूतांडव! भरधाव बेस्ट बसनं 5 जणांना चिरडलं, 35 जण जखमी; नेमकं काय घडलं?)

आरोपी बेस्ट चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. अपघात कसा घडला याबाबत त्याच्याकडे चौकशी सुरु आहे. याशिवाय प्रत्यक्षदर्शींचा जबाब नोंदवला जात आहे. अपघात घडल्यानंतर जखमींना वैद्यकीय मदत मिळवून देणे ही प्राथमिकता आहे. घटनास्थळावरील परिस्थिती नियंत्रणात असून बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

बस चालकावर गुन्हा दाखल

सोमवारी रात्री जेव्हा हा अपघात घडला तेव्हा, अपघातग्रस्त बस मध्ये तब्बल 60 प्रवासी होते. या प्रकरणी बस चालक संजय मोरे(५४) या बस चालकाला पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघातात गस्तीवर असलेले चार पोलिस आणि एमएसएफ जवान ही जखमी झाले आहेत.

6 जणांचा मृत्यू

कुर्ला येथील बेस्ट बस अपघातात आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झालाय. तर जखमी 43 जणांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विजय विष्णू गायकवाड(70), आफ्रीन अब्दुल सलीम शहा(19), अनम शेख(20), कणीस फातिमा गुलाम कादरी(55), शिवम कश्यप(18) अशी मृतांची नावे आहेत. या अपघातात चार पोलिस आणि एमएसएफ जवान ही जखमी झाले आहेत.