Kurla Best Bus Accident: कुर्ल्यामध्ये सोमवारी संध्याकाळी बेस्ट बसचा भीषण अपघात झाला. बसने समोर येणाऱ्या अनेकांना (Kurla Bus Accident) चिरडले. या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला. तर 35 जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. अचानक झालेल्या या जीवघेण्या अपघाताने कुर्ला पश्चिम येथील आंबेडकर नगरच्या रस्त्यावर स्मशान शांतता पसरली होती.
आरोपी बेस्ट चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. अपघात कसा घडला याबाबत त्याच्याकडे चौकशी सुरु आहे. याशिवाय प्रत्यक्षदर्शींचा जबाब नोंदवला जात आहे. अपघात घडल्यानंतर जखमींना वैद्यकीय मदत मिळवून देणे ही प्राथमिकता आहे. घटनास्थळावरील परिस्थिती नियंत्रणात असून बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
बेस्ट बसनं 5 जणांना चिरडलं
In a tragic accident in Kurla, Mumbai, a high-speed BEST bus collided with several people last night, resulting in the death of five individuals. The victims include four women and one man, aged between 18 and 70. In addition to the fatalities, 35 others were critically injured.… pic.twitter.com/G3T4bYYCBC
— IANS (@ians_india) December 10, 2024
5 जणांचा मृत्यू
1) विजय विष्णू गायकवाड (70)
2)आफ्रीन अब्दुल सलीम शहा (19)
3)अनम शेख (20)
4)कणीस फातिमा गुलाम कादरी (55)
5)शिवम कश्यप (18)
अशी मृतांची नावे आहेत. या अपघातात गस्तीवर असलेले चार पोलिस आणि एमएसएफ जवान ही जखमी झाले आहेत. यातील पीएसआय प्रशांत चव्हाण या जखमी अधिकाऱ्याच्या फिर्यादीवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील कारवाई कुर्ला पोलीस करत आहेत.
अपघाताचा सीसीटीव्ही
Mumbai Bus Accident Update: 4 Dead, 25 Injured, Including Police Officers
The tragic bus accident in Mumbai claimed 4 lives, including 3 women and 1 man, with 25 others injured and receiving treatment at Bhabha Hospital. Among the injured are 3 police personnel in critical… pic.twitter.com/3Mu8pk0xgR
— IANS (@ians_india) December 9, 2024
सोमवारी रात्री अपघातावेळी बसमध्ये 60 प्रवासी असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणी बस चालक संजय मोरे(54) याला पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघातात चार पोलिस आणि एमएसएफ जवान ही जखमी झालेत.