Kurla BEST Bus Accident: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी 10 डिसेंबर रोजी कुर्ला बेस्ट बस दुर्घटनेतील (Kurla Bus Accident) मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली. जखमींच्या उपचाराचा खर्च बेस्ट आणि बीएमसी उचलणार असल्याची घोषणाही मुख्यमंत्री फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी केली. मुंबईतील कुर्ला पश्चिम परिसरात सोमवारी रात्री बेस्टच्या बसने अनेकांना चिरडले. वाहनांचे नुकसान झाले. यात अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला, तर 49 जण जखमी झाले. (हेही वाचा:Kurla Best Bus Accident: कुर्ला बेस्ट बस अपघातात मृतांचा आकडा 6 वर; 43 जखमी, बस चालकावर गुन्हा दाखल)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोस्ट लिहित म्हटले की, “या घटनेतील मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून पाच लाख रुपये आर्थिक मदत देण्यात येईल. या घटनेत जे जखमी झाले, त्यांच्या उपचाराचा खर्च मुंबई महापालिका आणि बेस्टच्यावतीने करण्यासाठी आदेश देण्यात आले आहेत, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.”
मुख्यमंत्री कार्यालयातून एक्स पोस्ट
कुर्ला येथे बेस्ट बसच्या अपघातात काही लोकांचे मृत्यू झाले, त्याबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. तसेच जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, यासाठी मी प्रार्थना…
— @OfficeOfDevendra (@Devendra_Office) December 10, 2024
मुख्यमंत्री कार्यालयातून एक्स पोस्ट करण्यात आली आहे. यात म्हटलंय की, 'कुर्ला येथे बेस्ट बसच्या अपघातात काही लोकांचे मृत्यू झाले. त्याबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. तसेच जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, यासाठी मी प्रार्थना करतो, असेही त्यांनी म्हटले आहे.'