जगात कोरोना व्हायरस (Coronavirus) संसर्गाचा उद्रेक सुरुच आहे. कोविड-19 (Covid-19) वर लस उपलब्ध होत नाही तोपर्यंत संसर्गाला अटकाव करणे कठीण आहे. आज देखील रुग्णसंख्या वाढली असून सध्या जगातील कोरोना बाधितांचा आकडा 3.6 कोटींच्या पार गेला असून 9 लाखांहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाने (Johns Hopkins University) दिली आहे. रविवार सकाळपर्यंत जगभरातील कोरोना बाधितांची संख्या 30,674,077 झाली असून मृतांचा आकडा 955,440 वर पोहचला आहे. अशी माहिती माहिती युनिर्व्हिटी सेंटर फॉर सिस्टम आणि सायन्स (University's Center for Systems Science and Engineering) कडून देण्यात आली आहे.
CSSE च्या आकडेवारीनुसार, कोरोना बाधितांच्या संख्येत प्रथमस्थानी असलेल्या अमेरिकेत 6,764,780 कोरोना बाधित रुग्ण असून 199,258 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या क्रमावारीत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारतातील कोरोना बाधितांचा आकडा 54,00,620 वर पोहचला आहे. तर तब्बल 86,752 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
त्यापुढील क्रमवारी ब्राझील 4,528,240, रशिया 1,092,915, पेरू 756,412, कोलंबिया 750,471, मॅक्सिको 694,121, दक्षिण आफ्रीका 659,656, स्पेन 640,040, अर्जेंटीना 622,934, फ्रान्स 467,552, चिली 444,674, इराण 419,043, ब्रिटेन 392,844, बांग्लादेश 347,372, सौदी अरेबिया 329,271 आणि इराक 315,597 अशी आहे.
दरम्यान, कोरोना संसर्गामुळे मृत्यू झालेल्यांच्या संख्येत अमेरिकेनंतर ब्राझीलचा क्रमांक लागतो. 10,000 हून अधिक मृत्यू झालेल्या देशांमध्ये मॅक्सिको 73,258, ब्रिटन 41,848, इटली 35,668, फ्रान्स 31,257, पेरू 31,283, स्पेन 30,495, इराण 24,118, कोलंबिया 23,665, रशिया 19,128, दक्षिण अफ्रीका 15,940, अर्जेंटीना 12,799, चिली 12,254 आणि इक्वाडोर 11,084 या देशांचा समावेश आहे. (भारतात कोरोनाचा हाहाकार! देशात कोरोना बाधितांची एकूण संख्या 54 लाखांच्या पार, मृतांचा आकडा 86 हजारांच्या वर)
सातत्याने वाढत असलेल्या कोरोना संसर्गामुळे जगभरातील अनेक देश त्रस्त झाले आहेत. कोविड-19 च्या जागतिक आरोग्य संकटामुळे अर्थव्यवस्था ढासळली असून बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे. अनेक व्यवसाय, उद्योगधंदे बंद होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे या सर्व समस्यांमधून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या अनेक देशांसाठी कोविड-19 वरील लस दिलासादायी ठरेल. सध्या जगभरात कोरोनाच्या लसी विकासाच्या विविध टप्प्यात असून अद्याप संशोधन सुरु आहे. दरम्यान, या वर्षअखेरपर्यंत किंवा 2021 च्या सुरुवातीला लसी उपलब्ध होतील, अशी आशा आहे.