कोरोना व्हायरसचा (Coronavirus) संसर्ग सुरु झाला तेव्हापासून कोविड-19 (Covid-19) चे चार व्हेरिएंट्स (4 Variants) जगात फिरत आहेत, असा खुलासा जागतिक आरोग्य संघटनेने (World Health Organization) केला आहे. इंडिया टुडे च्या रिपोर्टनुसार, WHO ने पुढे सांगितले की, SARS-CoV-2 चा नवा स्ट्रेन साठी unusual public health events कारणीभूत ठरले आहेत.
यूएनच्या आरोग्य एजन्सीच्या मते, गेल्या वर्षी फेब्रुवारीच्या सुरूवातीच्या काळात जनुस एन्कोडिंग स्पाइक प्रोटीनमध्ये D614G चा सबस्टीट्यूशनसह कोरोनाव्हायरसचे एक प्रकार दिसू लागला. D614G चा उत्परिवर्तन, काही महिन्यांच्या कालावधीत, चीनमध्ये आढळून आलेल्या कोरोना व्हायरसपेक्षा वेगळा असल्याचे दिसून आले. दरम्यान, जून 2020 मध्ये कोरोना व्हायरसच्या म्युटेशनचा प्रसार जगात अधिक प्रबळ झाला.
Cluster 5 नावाचा अजून एक वेरिेएंट डेन्मार्क मध्ये गेल्या वर्षी ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये आढळून आला. डेन्मार्कमध्ये झालेल्या प्राथमिक अभ्यासानुसार चिंता व्यक्त केली जात आहे की या प्रकारामुळे माणसांमध्ये virus neutralization कमी होऊ शकते. त्यामुळे नैसर्गिक संक्रमण किंवा लसीकरणानंतर रोगप्रतिकार शक्तीची व्याप्ती आणि कालावधी कमी होण्याची शक्यता आहे.
त्यानंतर डिसेंबरमध्ये युके मध्ये कोरोना व्हायरसचा नवा स्ट्रेन आढळल्याचे युके सरकारकडून जाहीर करण्यात आले. SARS-CoV-2 VOC 202012/01 या नावाने हा नवा स्ट्रेन ओळखला जातो. हा प्रकार phylogenetically युकेमध्ये आधीच फिरत असलेल्या SARS-CoV-2 विषाणूशी संबंधित नाही. SARS-CoV-2 VOC 202012/01 ची उत्पत्ती कशी आणि कोठे झाली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. (कोरोना व्हायरसच्या नव्या स्ट्रेन वर देखील Covaxin प्रभावी ठरु शकते: Bharat Biotech)
दरम्यान, कोरोना व्हायरसच्या नव्या स्ट्रेनचे अगदी कमी रुग्ण भारतात आढळून आले आहेत. तसंच कोवॅक्सिन या नव्या स्ट्रेनवर देखील प्रभावी ठरेल, असे भारत बायोटेकचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे आज कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड लसींना आत्पातकालीन वापरासाठी परवानगी देण्यात आली आहे. भारताच्या या निर्णयाचे जागतिक आरोग्य संघटनने देखील स्वागत केले आहे.