कोरोना व्हायरसच्या नव्या स्ट्रेन वर देखील Covaxin प्रभावी ठरु शकते: Bharat Biotech
Covaxin (Photo Credits: Bharat Biotech)

भारत बायोटेक (Bharat Biotech) निर्मित Covaxin कोरोना व्हायरसच्या नव्या स्ट्रेन (Coronavirus New Strain) विरुद्ध परिणामकारक ठरु शकते अशी माहिती भारत बायोटेकने मंगळवारी दिली. Covaxin मधले प्रोटीन घटक व्हायरसच्या म्युटेशनचा खात्मा करते, असे भारत बायोटेकचे चेअरमन आणि मॅनेजिंग डारेक्टर Krishna Ella यांनी सांगतिले. दरम्यान, युके (UK) मध्ये पसरत असलेल्या कोरोना व्हायरसच्या नव्या स्ट्रेनवर SARS-CoV-2 प्रभावी ठरेल का असा प्रश्न उपस्थित केला जात असताना Krishna Ella यांची ही माहिती अतिशय दिलासादायक आहे.

कोरोना व्हायरसचे खूप म्युटेशन होऊ शकतात, अशी माहिती Krishna Ella यांनी तेलंगणा अॅकेडमी ऑफ सायन्सने आयोजित केलेल्या 9 व्या डॉ. मनोहर व्हि. एन. शिरोडकर मेमोरियल लेक्चरमध्ये दिली. (COVID19 Vaccine: केंद्र सरकारने सीरम, भारत बायोटेक यांना कोरोनावरील लसीसाठी परवानगी दिल्यास जानेवारी पासून लसीकरण सुरु होऊ शकते- राजेश टोपे)

हैद्राबाद स्थित भारत बायोटेक आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद हे एकत्रितपणे Covaxin ची निर्मिती करत आहेत. या लसीच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायल्स यशस्वीपणे पार पडल्या आहेत. तर 20,000 स्वयंसेवकांवर तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायल्स सुरु आहेत, असे Ella यांनी सांगितले. त्याचप्रमाणे कोविड-19 वर सिंगल डोस लस विकसित करण्याचे प्रयत्न देखील भारत बायोटेक करत आहे.

"Innovation in Public Health - Our Journey," या आपल्या लेक्चरमध्ये बोलताना Ella यांनी सांगितले की, जगात अजून 40,000 शोध न लागलेले व्हायरसेस आहेत तर 10,000 झुनोटिक व्हायरसेस आहेत आणि या सर्व व्हायरसेसचा अभ्यास करणे गरजेचे आहे. जेणेकरुन भविष्यामध्ये पुन्हा अशी परिस्थिती निर्माण होऊ नये.

दरम्यान, सध्या भारताती कोरोना बाधितांची संख्या 1,02,44,853 इतकी झाली असून त्यापैकी 2,62,272 सक्रीय रुग्ण आहेत. तर कोरोनावर मात केलेल्यांची संख्या 9,83,4141  इतकी झाली आहे. आतापर्यंत 1,48,439 मृतांची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे भारतात कोरोना व्हायरसच्या नव्या स्ट्रेनचे 20 रुग्ण आढळून आले आहेत.