उत्तर कोरिया (North Korea) सध्या दोन मोठ्या समस्यांना तोंड देत आहे. एक म्हणजे कोरोना व्हायरस (Coronavirus) आणि दुसरे म्हणजे अन्नाची कमतरता (Food Shortage). सध्या देशात पुरेसे अन्न नसल्याने लोक अस्वस्थ झाले आहेत. या संकटाला तोंड देण्यासाठी उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग (Kim Jong Un) याने धान्य विकत घेण्याऐवजी किंवा शेतीला प्रोत्साहन देण्याऐवजी, एक नवी युक्ती शोधून काढली आहे. अन्नाची कमतरता भागवण्यासाठी किमने कुत्री मारण्याचा निर्णय जारी केला आहे. किमच्या आदेशामुळे कुत्र्यांचे पालन करणारे लोक घाबरले आहेत. ज्या कुत्र्यांना आतापर्यंत प्रेमाने वाढवले त्यांनाच मारण्याची वेळ आली आहे.
उत्तर कोरियन लोकांना त्यांच्या पाळीव कुत्र्यांचा त्याग करण्यास भाग पाडले जात आहे, जेणेकरुन ही कुत्री रेस्टॉरंट्सना पुरवली जातील व अशाप्रकारे देशातील अन्नटंचाई दूर करण्यासाठी कुत्र्याच्या माणसाचा वापर होईल. किम जोंग उन याने यावर्षी जुलैमध्ये देशात कुत्र्याचे पालन करणे हे बेकायदेशीर असल्याचे जाहीर केले. कोरियन वृत्तपत्र चोसुन इल्बोच्या म्हणण्यानुसार उत्तर कोरियामधील अधिकाऱ्यांनी कोणकोणत्या घरात पाळीव कुत्री आहेत हे तपासणे सुरु केले आहे. जबरदस्तीने लोकांकडून कुत्रे घेऊन त्यांना सरकारी प्राणीसंग्रहालयात ठेवले जात आहे आणि येथून कुत्र्यांच्या मांसाची सेवा देणाऱ्या रेस्टॉरंटमध्ये त्यांची विक्री केली जात आहे.
कोरिया प्रायद्वीपात कुत्र्याचे मांस हे खूप लोकप्रिय आहे. मात्र आता दक्षिण कोरियामध्ये कुत्र्याचे मांस खाण्याचे प्रमाण कमी होत आहे. अद्याप मांसासाठी प्रतिवर्षी 1 दशलक्ष कुत्री वाढविली जातात आणि मारली जातात. उत्तर कोरियामध्ये अजूनही कुत्रा मांसाला प्राधान्य दिले जात आहे. उन्हाळ्यात आणि दमट हवामानात कुत्र्यांच्या मांसाला मोठ्या प्रमाणात पसंती दिली जाते. असा विश्वास आहे की यामुळे ऊर्जा आणि तग धरण्याची क्षमता वाढते. आता किम जोंगने कुत्र्याच्या माणसाला प्राधान्य देण्याचा फतवाच काढला आहे. (हेही वाचा: भूक लागली तर कपडे खा! किम जोंग-उन याने लॉन्च केले फॅशन प्रॉडॉक्ट)
दरम्यान, संयुक्त राष्ट्रांच्या ताज्या अहवालानुसार उत्तर कोरियामधील सुमारे 60 टक्के (2.55 कोटी) लोकांना अन्नटंचाईचा सामना करावा लागला आहे. अण्वस्त्र आणि लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांमुळे आंतरराष्ट्रीय निर्बंधांमुळे उपासमारीचे संकट वाढले आहे. कोरोना विषाणूच्या साथीमुळे चीनच्या सीमा बंद झाल्याने परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. इथे बहुतेक धान्य हे चीनमधून येते.