भूक लागली तर कपडे खा! किम जोंग-उन याने लॉन्च केले फॅशन प्रॉडॉक्ट
Kim Jong-un Launch new clothing line including EDIBLE clothes | | (Photo courtesy: archived, edited images)

उत्तर कोरिया देशाचा हुकुमशाहा किम जोंग-उन (Kim Jong-un) याने जनतेसाठी खास फॅशन प्रॉडॉक्ट (Fashion Products) लॉन्च केले आहेत. उत्तर कोरिया (North Korea) प्रदीर्घ काळापासून गरिबी आणि भूकबळीचा सामना करत आहे. अशा देशात किम जोंग-उन याने जलतरण, साहसी खेळांशी संबंधीत काही कपडे तयार केले आहेत. या कपड्यांचे वैशिष्ट्य असे की, हे कपडे तुम्ही वापरु शकताच पण, गरज पडल्यास तुम्ही हे कपडे खाऊही शकता. किम क्लोदिंग रिसर्च सेंटरमध्ये (Kim Clothing Research Center) या कपड्यांची निर्मिती करण्यात आली असून, हे कपडे प्लॅनलेट फॅब्रिक्सपासून तयार करण्यता आले आहेत. हे फॅब्रिक प्रोटीन, अमीनो अॅसीड, फ्रूट ज्यूस, आयर्न आणि कॅल्शियम आदी घटकांपासून बनविण्यात आले आहेत.

किमने लॉन्च केलेल्या किम क्लोदिंग रिसर्च सेंटर डिझायनर कपड्यांमध्ये पुरुषांसाठी जॅकेट आणि महिलांसाठी शनैल कंपनीचे डिझायनर बॉर्डरोबची कॉपीचा समावेश आहे. याशिवाय गुश्शी कंपनीच्या हँडबँगचाही समावेश आहे. त्यामुळे किमने ही उत्पादने बनवताना अमेरिकेच्या उत्पादनांची कॉपी केल्याचा आरोप होत आहे. उल्लेखनीय असे की, या कपड्यांवर लावण्यात आलेले कॅटलॉगही उत्कृष्ट पद्धतीने डिझाईन केले आहेत. यात किमने लॉन्च केलेल्या कपड्यांना स्मार्ट क्लोदिंग म्हणून सांगितले जात आहे. या कपड्यांच्या माध्यमातून आरोग्याची काळजी घेता येते. तसेच, भुकबळीच्या प्रदेशाच गरज पडल्यास हे कपडे खाताही येऊ शकतात, असा दावा करण्यात येत आहे. (हेही वाचा, दक्षिण कोरियाच्या राष्ट्रपतींना कुत्रे भेट; किम जोंगनी शब्द केला पूर्ण)

उत्तर कोरियात पर्यटन कंपनी चालवत असलेल्या तोंगिल टूर्सने इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना सांगितले की, किमने लॉन्च केलेली बॅग पुरुषांमध्येही चांगलीच लोकप्रिय आहे. याउलट महिलांसाठी लॉन्च करण्यात आलेली अनेक उत्पादनेह ही जून्या ट्रेंडची वाटतात. चीनी लोग या कपड्यांना 1990 च्या दशकातील फॅशन असे संबोधतात. असे असले तरी उत्तर कोरियाच्या लोकांसाठी मात्र ही अत्याधुनिक फॅशनच आहे.