दक्षिण कोरियाच्या राष्ट्रपतींना कुत्रे भेट; किम जोंगनी शब्द केला पूर्ण
(संग्रहित आणि संपादित प्रतिमा)

उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांना शेजारी राष्ट्र असलेल्या दक्षिण कोरियाच्या राष्ट्रप्रमुखांकडून चक्क भेट म्हणून कुत्रे मिळाले आहेत. दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती किम जोंग उन यांनी ही अनोखी भेट दिली आहे. पुंगसान प्रजातीच्या या कुत्र्यांची नावे साँगकॅंग आणि गोमी अशी आहेत. हे कुत्रे प्योंगयांग परिषदेचे प्रतीक म्हणून देण्यात आले आहेत. १८ ते २ सप्टेंबरपर्यंत चाललेल्या प्योंगयांग परिषदेत हे कुत्रे पाठवण्याबाबात शब्द दिला होता.

कोरियन डिमिलिटराइज्ड जोनध्ये उत्तर कोरियाच्या दिशेने कुत्र्यांची ही जोडी गुरुवारी सोडण्यात आली. दक्षिण कोरियानेही या आगत्यपूर्ण भेटीचा प्रेमाने स्वीकार केला. एका पत्रकार परिषदेत सांगण्यात आले की, दोन्ही कुत्रे एक वर्षाचे आहेत. त्यांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली असून, या जोडीत एक नर आणि एक मादी आहे.

दरम्यान, उभय देशांमध्ये असे होण्याची ही पहिली वेळ नाही. सन २०००मध्ये प्योंगयांग परिषदेदरम्यानही प्रतीक म्हणून किम जोंग उन यांचे वडील किम जोंग इल यांनी दक्षिण कोरियाचे तत्कालीन राष्ट्रपती किम दे जुंग कुत्र्यांची एक जोडी भेट दिली होती. २०१३ मध्ये त्या कुत्र्यांचा मृत्यू झाला. शिकारीच्या वैशिष्ट्यपूर्ण गुणांमुळे पुंगसान जातीच्या कुत्र्यांना विशेष ओळखले जाते.