Elon Musk ने खरेदी केला Twitter चा 9.2 टक्के हिस्सा; काय जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीची प्लान? जाणून घ्या
Elon Musk (Photo Credits: Getty Images)

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि टेस्ला (Tesla) चे सीईओ एलोन मस्क (Elon Musk) यांनी ट्विटर (Twitter) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममध्ये 9.2 टक्के हिस्सा खरेदी केला आहे. सोमवारी यूएस सिक्युरिटी अँड एक्सचेंज कमिशनच्या नियामक फाइलिंगमधून ही माहिती प्राप्त झाली आहे. मस्कने ट्विटरचे सुमारे 7.35 कोटी शेअर्स खरेदी केले आहेत आणि यासह ते फर्मचे सर्वात मोठे शेअरहोल्डर बनले आहेत. या बातमीने ट्विटरच्या शेअर्समध्ये मोठी उसळी पाहायला मिळाली. प्रीमार्केट ट्रेडिंगमध्ये ट्विटरचे शेअर्स 26 टक्क्यांपर्यंत वाढले. ट्विटरच्या शेवटच्या क्लोजच्या गणनेवर आधारित, ही हिस्सेदारी 280 करोड डॉलर इतकी आहे.

काही दिवसांपूर्वी इलॉन मस्क यांनी ट्विटरवर एक पोल आयोजित केला होता, ज्यामध्ये त्यांनी वापरकर्त्यांना विचारले होते की, ट्विटर भाषण स्वातंत्र्याच्या तत्त्वांचे पालन करते यावर त्यांचा विश्वास आहे का? या मतदानाला कॅप्शन देताना त्यांनी लिहिले की, "कोणत्याही लोकशाहीत अभिव्यक्ती स्वातंत्र्य आवश्यक आहे. ट्विटर या तत्त्वाचे काटेकोरपणे पालन करते यावर तुमचा विश्वास आहे का?" सुमारे 70% वापरकर्त्यांनी त्याला 'नाही' असे उत्तर दिले. याचा अर्थ असा आहे की, 70 टक्के वापरकर्ते असे मानतात की ट्विटर या तत्त्वांचे पालन करत नाही. (हेही वाचा - Elon Musk नवीन सोशल मीडिया प्लॅटफॉर्म लॉन्च करणार? भारतीय मित्राला ट्विटरवर दिले संकेत)

मस्क नवीन सोशल मीडिया प्लॅटफॉर्म लॉन्च करणार?

इतकंच नाही तर एक नवीन सोशल मीडिया प्लॅटफॉर्म तयार करण्याचा गांभीर्याने विचार करत असल्याचंही त्यांनी त्यावेळी सांगितलं होतं. एका वापरकर्त्याने त्यांना विचारले की, मस्क तुम्ही एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म तयार करण्याचा विचार करणार का? ज्यामध्ये ओपन-सोर्स अल्गोरिदम असेल आणि कमीतकमी प्रचारासह भाषण स्वातंत्र्याला प्राधान्य दिले जाईल. मस्क यांनी वापरकर्त्याला या प्रश्नाचे सकारात्मक उत्तर दिलं होतं.

मस्क ट्विटरवर खूप सक्रिय आहेत. परंतु अलीकडे त्यांनी सोशल मीडियावर ट्विटरवर अनेकदा टीका केली आहे. मस्कने ट्विटरचे सुमारे 7.35 कोटी शेअर्स खरेदी केले आहेत आणि यासह ते फर्मचे सर्वात मोठे शेअरहोल्डर बनले आहेत.