Elon Musk (Photo Credits: Getty Images)

टेस्लाचे सीईओ एलोन मस्क (Elon Musk) स्वतःचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म (Social Media Platform) लॉन्च करणार असल्याची शकता वर्तवण्यात येत आहे. ते यावर 'गांभीर्याने विचार' करत आहेत, असं त्यांनी सांगितलं आहे. Elon Musk यांनी ट्विटरवर याबाबत माहिती दिली आहे. वास्तविक, गेल्या काही दिवसांपासून मस्क मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरवर मुक्त भाषण आणि इतर गोष्टींबद्दल मत विचारत आहेत.

या ट्विटनंतर, इलॉन मस्कचा मित्र प्रणय पाथोले (Pranay Pathole) याने विचारले की, तो 'सर्वोच्च प्राधान्य म्हणून मुक्त भाषण' आणि 'अत्यंत कमी प्रचार' असलेले व्यासपीठ सुरू करणार आहे का? या ट्विटला प्रत्युत्तर देताना मस्क म्हणाले की, मी याबाबत खूप गंभीर आहे. (हेही वाचा - MRSAM Missile: जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या भारतीय क्षेपणास्त्राची ओडिशात यशस्वी चाचणी, जाणून घ्या खासियत)

दरम्यान, अलीकडच्या काही दिवसांत मस्क यांनी ट्विटरच्या अल्गोरिदमवर टीका केली आहे. इलॉन मस्क यांचा असा विश्वास आहे की, कार्यशील लोकशाहीसाठी भाषण स्वातंत्र्य खूप महत्वाचे आहे. यानंतर, त्यांनी गेल्या आठवड्यात एक सर्वेक्षण देखील तयार केले. जिथे मस्कने विचारले की, ट्विटर भाषण स्वातंत्र्याच्या तत्त्वाचे काटेकोरपणे पालन करते का? 20 लाखांहून अधिक लोकांनी या पोलवर मतदान केले, त्यापैकी 70 टक्के लोकांचा असा विश्वास होता की, ट्विटर हे करू शकत नाही.

त्यानंतर इलॉन मस्क यांच्या ट्विटची चर्चा सुरू झाली आहे. लोक त्यांच्या प्लॅटफॉर्मच्या नावाचाही अंदाज लावू लागले आहेत. कदाचित एलोन मस्क कधीही त्याचे प्लॅटफॉर्म लॉन्च करू शकतात. सध्या लोकांमध्ये याची चर्चा सुरू झाली आहे. ट्विटर आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या अल्गोरिदमवर यापूर्वी अनेकदा टीका झाली आहे. अलीकडेचं अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही त्यांचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथ सोशल लाँच केले आहे.

विशेष म्हणजे, इलॉन मस्क ट्विटरवर मोजक्याच लोकांना फॉलो करतात, ज्यांची संख्या 112 आहे. नुकताच भारतीय प्रणय पाथोळे चर्चेत आला आहे. अहवालांवर विश्वास ठेवला तर, मस्क त्याला ट्विटरवर फॉलो करतो. 2018 मध्ये एका ट्विटद्वारे दोघांची मैत्री झाली होती. प्रणयने टेस्लाच्या स्वयंचलित विंडस्क्रीन वायपरबद्दल ट्विट केले होते आणि त्यात मस्कला संबोधित केले होते. त्यानंतर त्याला टेस्ला बॉसकडून उत्तर मिळाले होते.