E-cigarettes | Representational & Edited Image (Photo Credits: Pixabay)

सार्वजनिक आरोग्याचे (Public Health) रक्षण करण्यासाठी एक प्रमुख पाऊल म्हणून, ऑस्ट्रेलिया (Government of Australia) सरकारनेही भारताच्या पावलावर पाऊल ठेवले आहे. ऑस्ट्रेलियानेही ई-सिगारेटवर बंदी (E-Cigarettes Banned in Australia) घातली आहे. या निर्णयामुळे ऑस्ट्रेलिया ई-सिगारेट (e-cigarettes) बंदी करणाऱ्या देशांच्या यादीत 47 वा देश ठरला आहे. या आधी भारत, सिंगापूर, थायलंड, अर्जेंटिना, जपान, ब्राझील यांसारख्या देशांनी ई-सिगारेटवर बंदी घातली आहे. किशोरवयीन मुले आणि शाळकरी विद्यार्थी यांच्यात वाढत्या धुम्रपाणाच्या व्यसनाधिनतेला आळा घालण्यासाठी ऑस्ट्रेलियाने हे पाऊल उचलले आहे.

ऑस्ट्रेलियन आरोग्य मंत्री, मार्क बटलर यांनी सांगितले की, धुम्रपाण ही ऑस्ट्रेलियन शाळांतील एक महत्त्वपूर्ण समस्या बनली आहे. ज्याला एक महामारी म्हणूनही पाहिले जात आहे. ज्यामुळे शाळांमधील धुम्रपाणाबद्दल चितेच्या नजरेने पाहिले जात आहे. ई-सिगारेट आकाराने लहान असल्याने ते दप्तरात अथवा इतर ठिकाणी लपविण्यास सोपे जाते. तसेच याचा वापर केल्यान शरीरामध्ये अनावश्यक प्रमाणात निकोटीन जाते. त्यामुळे याचे उत्पादन आणि वापरच बंद करण्याचा सरकारचा मानस असल्याचेही मार्क बटलर म्हणाले. (हेही वाचा, Paan Shops Demolished in Mumbai: ई-सिगारेटची विक्री रोखण्यासाठी मुंबई पोलिसांनी जमीनदोस्त केली 320 पान दुकानं; शहरातील प्रसिद्ध मुच्छड पानवाला यांचाही समावेश)

ऑस्ट्रेलियातील आणि जगभरातील डॉक्टर, बालरोगज्ज्ञ, मानसशास्त्रज्ञ यांच्यासर इतरही विविध क्षेत्रातील अभ्यासक हे ई-सिगारेटच्या आणि वॅपींगच्या विरोधात बोलत आहेत. ई-सिगारेटचा दीर्घकालीन प्रभाव अद्याप पुरेसा स्पष्ट झाला नाही. परंतु आतापर्यंत झालेल्या अभ्यासानुसार ई-सिगारेट पिणाऱ्या नागरिकांमध्ये फुफ्फुसाच्या गंभीर दुखापती आणि त्यांच्या वापराशी संबंधित प्रतिकूल आरोग्यावर परिणाम दिसून आले आहेत.

ई-सिगारेट्स, ज्यांना इलेक्ट्रॉनिक सिगारेट, ई-सिग्स किंवा वाईप्स म्हणूनही ओळखले जाते. ही अशी उपकरणे आहेत जी द्रव द्रावण (ई-लिक्विड) वाफ करण्यासाठी उष्णता वापरतात ज्यामध्ये सामान्यत: निकोटीन, फ्लेवरिंग्ज आणि इतर रसायने असतात. ई-सिगारेटद्वारे तयार होणारी वाफ नंतर वापरकर्त्याद्वारे इनहेल (शरीरात ओढली जाते) केली जाते. पारंपारिक सिगारेटच्या तुलनेत कमी हानिकारक पर्याय म्हणून ई-सिगारेटची विक्री केली जाते कारण ते धूर निर्माण करत नाहीत आणि त्यात टार नसतात, जे जाळलेल्या तंबाखूचे उपउत्पादन आहे.

एकंदरीत, पारंपारिक सिगारेटपेक्षा ई-सिगारेट कमी हानिकारक असू शकतात, परंतु ते पूर्णपणे सुरक्षित नाहीत आणि सावधगिरीने वापरल्या पाहिजेत. व्यक्तींनी ई-सिगारेट वापरण्यापूर्वी संभाव्य जोखीम आणि फायद्यांची तुलना करणे महत्वाचे आहे आणि धोरणकर्त्यांनी त्यांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी या उत्पादनांचे निरीक्षण करणे आणि त्यांचे नियमन करणे सुरू ठेवणे आवश्यक आहे.