Bitcoin In El Salvador: अधिकृत मान्यता मिळाल्यावर एल साल्वाडोर देशात बिटकॉईन करन्सीची कशी आहे स्थिती? घ्या जाणून
Cryptocurrency | Image Used For Representational purpose Only (Photo Credits: Pixabay.com)

बिटकॉईन (Bitcoin) अर्थातच क्रिप्टोकरन्सी (Cryptocurrency ) म्हटलं की जगभरातील अनेक दश नाकं मुरडतात. भारताचाही त्यात समावेश आहे. असे असले तरी अनेक देशांनी मात्र बिटकॉईन स्वीकारला आहे. प्रामुख्यान सेंट्रल अमेरिकी देश म्हणून ओळखल्याजाणाऱ्या एल साल्वाडोर (El Salvador) या देशाने बिटकॉईन ही आपली अधिकृत करन्सी ( Bitcoin In El Salvador) म्हणून स्वीकार केला. अशा प्रकारचा स्वीकार करणारा El Salvador हा जगातील पहिला देश ठरला. एल साल्वाडोर चे राष्ट्रपती नईब बुकेले (Nyib Bukele) यांनी बिटकॉईनला अधिकृततेचा दर्जा देण्याचे पाऊल उचलले आहे. पण, आजही साल्वाडोरच्या जनतेच्या मनात बिटकॉईनबाबत म्हणावा तसा विश्वास वाटत नाही.

दरम्यान, सल्वाडोरमधील सत्ताधारी बुकेले सरकारचा दावा असा की, बिटकॉईनबाबतच्या निरणयामुळे देशातील जनतेला पहिल्यांदा बँक सेवांपर्यंत ओळख मिळेल. तसेच, विदेशातून मायदेशी पाठवल्या जाणाऱ्या रेमिटेंड्स फंडांवर 400 मिलियन डॉलरच्या शुल्कातही कपात होईल. नईब बुकेले यांनी सोमवारी केलेल्या एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, इतिहासात पहिल्यांदाच संपूर्ण जगाची नजर सल्वाडोरवर राहिली. हे सगळे बिटकॉईनमुळे घडले. त्यांनी म्हटले की त्यांच्या सरकारने पहिल्यांदा 400 बिटकॉइन खरेदी केले. त्यांनी आणखीही काही बिटकॉईन खरेदी केल्याचे सांगितले. क्रिप्टोकरन्सी एक्चेंजींग अॅप Gemini अन्वये हे 400 बिटकॉईन 21 मिलियन डॉलरच्या किमतीवर ट्रेड कर होते. (हेही वाचा, El Salvador ठरला Bitcoin ला औपचारिक मान्यता देणारा जगातील पहिला देश )

जूनमध्ये अल सर्वाडोरच्या संसदेने एक कायदा संमत केला. ज्यात क्रिप्टोकरन्सीही लिगल टेंडर झाले आहे. म्हणजेच त्याला अधिकृत दर्जा देण्यात आल्याचे म्हटले. त्यामुळे वस्तू, सेवा खरेदीमध्ये बिटकॉईनचा थेट वापर करता येऊ शकतो. ज्याप्रमाणए यूएस डॉलरचा वापर होतो तसाच बिटकॉईनचाही होईल, असे बुकेले सरकारने म्हटले. बुकेले सरकारचे हे एक महत्त्वाकांक्षी बिल होते. सल्वाडोरच्या संसदेत सादर झाल्यानंतर हे विधेयक अवघ्या 24 तासात मंजूर झाले.

दरम्यन, क्रिप्टोकरन्सीच्या किमती सतत कमी अधि होत राहतात. त्या अस्थितर असतात. त्यामुळे ही एक हायली वॉलेटाईल अॅसेट आहे. वेगाने वर जाते आणि अत्यंत वेगाने खाली घसरते.कारण तिची कोणतीही नियमन संस्था नाही. त्यामुळे हे गणित अधिकच जोखमीचे होऊन बसते. यात एक्सपर्ट्स आणि नियामक संस्था या करन्सीबाबत उघड विचार ठेवत नाही. त्यािमुळे अनेकांनी बुकेल सरकारच्या या निर्णयाला विरोध केला आहे. काहींनी शंका घेतली आहे. त्यामुळे एल सल्वाडोरमध्ये बिटकॉईन अधिकृत असला तरी आजही तो जनतेच्या मनात संभ्रमावस्थेतच आहे. (हेही वाचा, Cryptocurrency: क्रिप्टोकरन्सी, बिटकॉईन ब्लॉकचेन आदी गुंतवणूक किती सुरक्षीत? खरोखरच सुरक्षीत असतो आपला पैसा?)

एल सल्वाडोरची राजधानी सॅन सल्वाडोर येथे पाठिमागच्या आठवड्यात बिटकॉईन विरोधात एक आंदोलन झाले. तसेच, मधल्या काळात सल्वाडोरमध्ये एक सर्वोही झाला. सुमारे 6.5 मिलियन लोकांनी यात मतं नोंदवली. यात लोकांनी म्हटले की ते केवळ यूएस डॉलरच चलन म्हणून वापरतील. अनेक लोकांना वाटते की बिटकॉईन हे चल प्रत्यक्षात अस्तित्वातच नाही. त्यामुळे सर्वसामान्य जनता या चलनाचा कधीच वापर करणार नाही. त्यामुळे या चलनाचा वापर केवळ श्रीमंत लोक करतील. ज्याचा गरिबांच्या शोषणासाठी वापर केला जाईल. जर लोकांकडे पोट भरण्यासाठीच पैसे नसतील तर ते बिटकॉईनमध्ये कसे गुंतवणूक करतील?