COVID 19 Pandemic in World: जगभरात Coronavirus संक्रमित सर्वाधिक रुग्णसंख्येत भारत दुसऱ्या क्रमांकावर
Coronavirus | Image Used For Representative Purpose | (Photo Credits: unsplash.com)

कोरोना व्हायरस (Coronavirus) संक्रमित रुग्णसंख्येत अमेरिके पाठोपाठ भारत हा अव्वल देशांपैकी एक ठरतो आहे. जगभरातील देशांच्या तुलनेत भारतातील कोरोना संक्रमितांची आकडेवारी पाहिली तर अमेरिका प्रथम आणि त्यांनंतर दुसऱ्या क्रमांकावर भारताचे नाव आहे. जॉन्स हॉपकिन्स यूनिवर्सीटीने गुरुवारी (6 मे ) जाहीर केलेल्या वैश्विक आकडेवारीनुसार जगभरात 154.7 नागरिकांना कोविड 19 विषाणू संसर्ग झाला आहे. तर 3.23 कोटी पेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. जॉन्स हापकिन्सच्या सेंटर फॉर सिस्टम सायन्स अॅण्ड इंजीनियरिंग (CSSE) ने म्हटले आहे की, विद्यमान स्थितीत कोरना संक्रमितांची संख्या आणि मृत्यू अनुक्रमे 154,763,588 आणि 3,237,435 इतका आहे. कोरोना व्हायरस महामारीने जगभरात (COVID 19 Pandemic in World) थौमान घातले आहे. अनेक देशांमध्ये पहिली लाट जाऊन कोरोना महामारीची दुसरी किंवा तिसरी लाट आली आहे. कोरोना महामारिचा जगातील प्रत्येक देशाला फटका बसला आहे. यातून काही देश स्वत:ला सावरत बाहेर पडत आहेत. मात्र काही देशांची अवस्था बिकट होत चालली आहे.

CSSE ने दिलेल्या आकडेवारीनुसार, जगभरात 32,557,29 संक्रमित आणि 579,265 मृत्यूंसह अमेरिकेत कोरोनाचा सर्वाधिक धक्का बसला आहे. कोरोना संक्रमनात भारत 20,665,148 सक्रमितांस दुसऱ्या क्रमांकावर आहे. कोरोना व्हायरस संक्रमितांचे जगभरातील देशांचे आकडे पुढील प्रमाणे. आकडेवारी CSSE अन्वये. ब्राजील (14,930,183), फ्रान्स (5,767,541), तुर्की (4,955,594), रशिया (4,792,354), यूके (4,441,642), इटली (4,070,400), स्पेन (3,551,262), जर्मनी (3,471,616), अर्जेंटीना (3,071,496), कोलम्बिया (2,934,611), पोलंड (2,811,951), ईरान (2,591,609), मेक्सिको (2,356,140) और यूक्रेन (2,146,121) . (हेहीव वाचा, COVID 19 In India: भारतामध्ये पुन्हा उच्चांकी कोरोनारूग्णांची नोंद; मागील 24 तासांत 4,12,262 जणांना कोरोनाचे निदान)

कोरोना व्हायरस संसर्गामुळे झालेली मृत्यूंची संख्या पाहता अमेरिकेनंतर ब्राझील दुसऱ्या क्रमांकावर आहे. ब्राझिलमध्ये आतापर्यंत 414,399 नागरिकांचे मृत्यू झाले आहेत. साधारण 50,000 पेक्षा अधिक मोठ्या प्रमाणावर मृत्यू झालेल्या देशांमध्ये भारत (226,188), मेक्सिको (218,004), यूके (127,830), इटली (122,005), रशिया (110,022), फ्रान्स (105,792), जर्मनी (83,981), स्पेन (78,566), कोलंबिया (76,015), ईरान (73,568), पोलंड (68,482), अर्जेंटीना (65,865), पेरू (62,674) आणि दक्षिण अफ्रीका (54,557) आदी राष्ट्रांचा समावेश आहे.