Covid-19 चं उगमस्थान नैसर्गिक, लॅब मधून लीक झाल्याची शक्यता नाही; वैज्ञानिकांचा दावा
Coronavirus | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

SARS-CoV-2 Virus,ज्यामुळे सध्या जगभरात कोविड 19 चं संकट घोंघावत आहे त्याचं मूळ शोधण्याचं काम सध्या वैज्ञानिकांकडून केलं जात आहे. सध्या जगभरातील वैज्ञानिकांनी केलेल्या नव्या दाव्यानुसार या वायरसच मूळ हे प्राण्यामधून मनुष्यात आलेले आहे. कोरोना वायरस चीनच्या वूहान लॅब मधून लीक झाल्याचा पुरावा नाही. दरम्यान अद्याप प्रसिद्ध न झालेल्या एका अभ्यासात असं सांगण्यात आले आहे. प्री- प्रिंट सर्व्हर Zenodo च्या दाव्यानुसार कोविड 19 जागतिक आरोग्य महामारीला कारणीभूत असलेल्या या वायरसच्या लॅबमधून लीक झाल्याचे शून्य पुरावे सध्या उपलब्ध आहेत.

सध्या कोविड 19 चे उगमस्थान शोधण्यासाठी जगभरातील प्रतिथयश वैज्ञानिक विविध विद्यापीठांमधून, रिसर्च इंस्टिट्युट मधून एकत्र आले आहेत. याच्या उगमस्थानाबददल अजूनही मतमतांतर आहेत.

ऑस्ट्रेलियाच्या University of Sydney चे प्राध्यापक Edward Holmes यांनी दिलेल्या माहितीनुसार, काळजीपूर्वक आणि अगदी सुक्ष्म अभ्यास करून देखील सध्या उपलब्ध माहितीमध्ये कुठेही SARS-CoV-2 हा लॅब मधून आलेला असल्याची माहिती नाही. वुहानमधील प्राण्यांच्या बाजारपेठेच्या स्पष्ट साथीच्या दुव्याच्या उलट पूर्वी देखील Wuhan Institute of Virology निगडीत कोणत्याही केसेसचं कनेक्शन नसल्याचं लेखकांचं मत आहे.

दरम्यान SARS-CoV-2 वर Wuhan Institute of Virology यापूर्वीदेखील काम करता असल्याचे कोणतेही पुरावे नाहीत. पण SARS-CoV-2 च्या उगमासाठी झुनोटिक मूळचे समर्थन करणारे पुरावे सापडले अ सल्याचं वैज्ञानिकांचं मत आहे. लॅब मधील अपघाताची देखील पूर्ण शक्यता अजून नाकरता येत नाही. वाईल्डलाईफ ट्रेड मध्ये वारंवार माणूस आणि प्राण्यांचा संपर्क येत असतो असे देखील पेपर मध्ये सांगण्यात आले आहे.

डिसेंबर 2019 मध्ये वूहानमध्ये पहिली कोरोना वायरसची केस समोर आली होती. अजूनही त्याचा धोका पूर्णपणे टळलेला नाही त्यामुळे आता मनुष्यामध्ये हा SARS-CoV-2 कसा आला याची उत्सुकता वाढली आहे.

वैज्ञानिकांच्या ग्लोबल टीम मध्ये University of Edinburgh in the UK, University of Saskatchewan, Canada, University of California Berkeley and Pennsylvania State University, US, University of Otago in New Zealand आणि Jiaotong-Liverpool University, China चे वैज्ञानिक सहभागी होते.