COVID-19 Delta Variant: जगभरात 96 देशांमध्ये सापडला डेल्टा व्हेरीएंट, जागतिक आरोग्य संघटनेची माहिती
COVID-19 Delta Variant | (Image used for representational purpose only) (Photo Credits: Pixabay)

जागतिक आरोग्य संघटना (World Health Organization) अर्तातच डब्ल्यूएचओ (WHO) ने दिलेल्या नव्या माहितीमुळे जगासमोरील चिंता आणखी वाढण्याची चिन्हे आहेत. कोरोना व्हायरस (Coronavirus) विषाणुचा डेल्टा कोविड वेरिएंट (COVID-19 Delta Variant) आता जगभरातील 96 देशांमध्ये आढळून आला आहे. हा आकडा गेल्या आठवड्याच्या तुलनेत 11 ने अधिक आहे. वृत्तसंस्था सिन्हुआच्या हवाल्याने आयएनएसने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, बुधवारी (30 जून) अद्ययावत झालेल्या माहितीत म्हटले आहे की, डेल्टा व्हेरिएंटला डबल म्यूटेंटही म्हटले जाते. यात दोन म्यूटेशन असतात. अल्फा व्हेरिएंटच्या तुलनेत 55% अधिक permeable आहे. जो सुरुवातीला यूकेमध्ये आढळला होता. पुढे तो अत्यंत वेगाने जागतिक स्तरावर पोहोचला. हा व्हेरिएंट जागतिक पातळीवर चिंतेचा विषय ठरु शकतो, असेही डब्ल्यूएचओने बुधवारी म्हटले आहे.

अफ्रीकेने व्हेरिएंटच्या नव्या प्रकोपाची सूचना दिली आहे कारण, ट्यूनीशिया, मोजाम्बिक, युगांडा, नाइजीरिया आणि मलावी या डेल्टामुळे 11 देश संक्रमित आहेत. पहिल्यांदा ऑक्टोबर 2020 मध्ये पुढे आले होते की, डेल्टा व्हेरिएंटमध्ये स्पाइक म्यूटेशन आहे. जे याच्या संप्रेषणीयता आणि अँटीबॉडी अकार्यक्षम करण्याच्या विरोधात आमि संभाव्य धोकाही वाढवतात. स्कॉटलँडमध्ये नुकताच करण्यात आलेल्या आणि आंतरराष्ट्रीय मेडिकल जर्नल लॅन्सेटमध्ये प्रकाशित एका अभ्यासात आढळून आले आहे की, डेल्टा व्हेरिएंट संक्रमित व्यक्ती रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण अल्फा स्ट्रेनच्या संक्रमित लोकाच्या तुलनेत 85% इतके आहे. (हेही वाचा, Sambhaji Bhide on Pandharpur Ashadi Wari: 'पंढरपूर आषाढी वारीस परवानगी द्या, देशातील नव्हे तर जगातील करोना नामशेष होईल'-संभाजी भिडे)

दरम्यान, भारतामध्येही या नव्या व्हेरीएंटचेकाही रुग्ण आढलून आले आहेत. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये हा व्हेरीएंट आढळून आले आहेत. या व्हेरीएंटने संक्रमित असलेल्या काही रुग्णांनी यशस्वी मात करत रुग्णालयातून डिस्चार्ज मळवला आहे. राज्य सरकारही नव्या व्हेरीएंटबाबत सतर्क आहे. सर्व जिल्ह्यांमध्ये नव्या व्हेरीएंटचा प्रादूर्भाव अधिक वाढू नये यासाठी प्रयत्न सुरु आहेत.

देशात पाठिमागील 24 तासात 48,786 जणांना कोरोना व्हायरस संसर्ग झाला. तर 61,588 जणांना कोरोनावर मात केली. त्यांना रुग्णालयातून डिस्चार्जही मिळाला. देशातील सध्यास्थिती सक्रिय रुग्णांची संख्या 5,23,257 इतकी आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.