Tiger | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

आतापर्यंत केवळ मानवी शरीरात होत असलेली कोरोना व्हायरस (Coronavirus) संसर्गाची बाधा आता वन्यजीव आणि प्राण्यांनाही होऊ लागल्याची धक्कादायक घटना पुढे आली आहे. अमेरिका (USA) संघराष्ट्रातील न्यूयॉर्क (New York) शहरात असलेल्या एका प्राणिसंग्रहालयात ही घटना घडली आहे. येथील प्राणिसंग्रहालयात एक वाघ (Tiger) कोरोना व्हायरस पॉझिटीव्ह (Tiger Coronavirus Positive) आढळला आहे. या वाघाची कोरोना व्हायरस चाचणी केली असता तो अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार गेल्या 24 तासात अमेरिकेत कोरोना व्हायरस संसर्ग होऊन मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या तब्बल 12 इतकी झाली आहे. त्यातच वाघाचे वृत्त आले आहे. त्यामुळे आता मानवासोबत वन्यप्राणीही सुरक्षीत नाहीत की काय अशी भीती व्यक्त केली जात आहे.

बीबीसीने आपल्या वृत्तात म्हटले आहे की, वाइल्ड लाईफ कंजर्वेशन सोसायटी नियंत्रीत ब्रोंक्स झू (प्राणिसंग्रहालय) ने दिलेल्या माहितीनुसार, न्यूयॉर्क शहरातील एका वाघाची कोरोना व्हायरस चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. हा वाघ एक चार वर्षांची मादी आहे. या मादी वाघाचे म्हणजेच वाघिणीचे नाव नादिया असे आहे. या वाघिणीसोबत इतरही तीन इतर वाघ आणि तीन अफ्रीकन वाघांनाही कोरडा खोकला आणि शिंखा असा त्रास होत असल्याचे पुढे आले आहे. हे वाघ लवकरच बरे होती, असा विश्वास प्रशानाने व्यक्त केला आहे. (हेही वाचा, Coronavirus Outbreak: अमेरिकेत कोरोनाचा हाहाकार! 300,000 लोकांना कोरोनाची लागण तर मृत्यांची संख्या 8000 वर; जगात कोरोनाच्या बळींची संख्या 60000 च्या पार)

एआयएनएस ट्विट

दरम्यान, एका पाळीवर कुत्र्यालाही कोरोना व्हायरसची लक्षणं दिसून आली होती. दरम्यान एखाद्या वन्यजीवास कोरोना व्हायरसची लागण प्राण्यांनाही झाल्याची ही पहिलीच घटना असल्याचे सांगितले जात आहे. सांगितले जात आहे की, डिपार्टमेंट ऑफ अॅग्रीकल्चर नॅशनल वेटर्नरी सर्विसच्या लॅबमध्ये या वाघाची चाचणी घेण्यात आली. हा वाघ कोविड 19 संक्रमीत असल्याचे पुढे आले आहे.

शंका व्यक्त केली जात आहे की, हा वाघ कोरोना व्हायरस बाधित कर्मचाऱ्याच्या अथवा इतर व्यक्तिच्या संपर्कात आला असावा. ज्यामुळे त्यालाही या वाघालाही कोरोना व्हायरस बाधा झाली असावी. 27 मार्च रोजी या वाघाला पहिल्यांदा कोरोना व्हायरस झाल्याची लक्षणं आढळून आली होती. वाईल्डलाईफ कंजर्वेशन सोसायटीने दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे की, या वन्यजीवांच्या आहार घेण्याच्या नेहमीच्या सवयीत बरीच घट झाली आहे. हे प्राणी कमी आहार घेत आहेत. दरम्यान, असे असले तरी हे प्राणी सामान्य आहेत. त्यांच्या कोणत्याही प्रकारची तीव्र लक्षणं दिसत नाहीत. सध्या हा वाघ आणि त्याच्या सोबतीचे काही वाघ डॉक्टरांच्या निरिक्षणाखाली आहेत.