कोरोना व्हायरसचे संपूर्ण जगात हाहाकार घातला आहे. चीन मधून परसलेल्या या व्हायरसने चीननंतर इतर देशांना आपला विळखा घालायला सुरुवात केली. यात स्पेन (Spain), इटली (Italy), जर्मनी (Germany), अमेरिका (America) या देशांत कोरोनाने आपला प्रभाव अधिक तीव्र केला. अमेरिकेत सध्या कोरोनाचा धुमाकूळ पाहायला मिळत आहे. अमेरिकेत तब्बल 300,000 लोकांना कोरोनाची लागण झाली असून यात बळी पडलेल्यांची संख्या 8300 वर गेली आहे. याच पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी अमेरिकन नागरिकांना खबरदारी घेण्यास सांगितले आहे. तसंच जगात 11 लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची बाधा झाली असून जगभरात कोरोनाने घेतलेल्या बळींची संख्या 60,000 वर गेली आहे. त्यामुळे कोरोनाच्या प्रभाव असलेल्या सर्व देशांमध्ये लॉकडाऊन घोषित करण्यात आहे. लॉकडाऊनमुळे जगातील करोडो नागरिक घरीच अडकवून पडले आहेत.
अमेरिकन नागरिकांशी संवाद साधताना राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, "सध्या परिस्थिती अत्यंत भयावह असून कोरोनाग्रस्तांचे समोर येणारे आकडे अत्यंत चिंताजनक आहे. येणारा आठवडा हा अतिशय कठीण असू शकतो. या काळात मृतांची संख्या वाढण्याची दाट शक्यता आहे. आपण आपल्या देशाची वाताहत होऊ देणार नाही. मात्र प्रसंगी कठोर निर्णय घ्यावे लागतील. न्युयॉर्कमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळल्यामुळे 1 हजार सैन्य दलातील डॉक्टर आणि नर्सेस शहरात तैनात करण्यात येणार आहेत."
ANI Tweet:
Confirmed #coronavirus cases in US top 300,000, Johns Hopkins University: AFP news agency
— ANI (@ANI) April 4, 2020
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना Hydroxychloroquine या मेलेरियाच्या औषधाचे शिपमेंट्स वाढवण्यास सांगितले आहे. या औषधाच्या उपयोग करुन कोरोनावर लस शोधण्यासाठी क्लिनिकल टेस्ट सध्या अमेरिकेत सुरु आहे.
स्पेन, इटली आणि अमेरिकेत सध्या मृत्यूचे तांडव सुरु आहे. स्पेनमध्ये आतापर्यंत 1 लाख 20 हजारापेक्षा अधिक लोकांना कोरोनाची बाधा झाली असून मृतांचा आकडा 11 हजारांच्या वर गेला आहे. तर इटलीमध्ये 1 लाख 24 हजारपेक्षा अधिक लोक कोरोनाग्रस्त असून 15 हजार लोकांचा यात बळी गेला आहे.